Bharat Gogawale on Sunil Tatkare : गोगावले समर्थकांचा नॅपकीन टोला, तटकरे पुन्हा लक्ष्य

Bharat Gogawale on Sunil Tatkare : भरत गोगावले यांच्या कार्यक्रमात नॅपकीन वाटप करत तटकरे यांना डिवचलं; शिवसेना-राष्ट्रवादीत वाद चिघळण्याची चिन्हं.

Bharat Gogawale on Sunil Tatkare : मंत्री भरत गोगावले यांच्या अभिष्टचिंतन कार्यक्रमात काहीसे अनोखे दृश्य पाहायला मिळाले. कार्यक्रमात गोगावले समर्थकांनी सफेद नॅपकीन वाटप करत खासदार सुनिल तटकरे यांना डिवचलं. काही दिवसांपूर्वी महाडमध्ये तटकरे यांनी गोगावले यांच्या नॅपकीन वापराची नक्कल करत टिका केली होती.

त्याच पार्श्वभूमीवर गोगावले समर्थकांनी हा प्रतिउत्तरात्मक कार्यक्रम रचला आणि नॅपकीन वाटपाच्या माध्यमातून राजकीय सॅटायरची नवी झलक दाखवली.

या घटनेमुळे शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील तणाव पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून रायगड जिल्ह्यात राजकीय चर्चेला नवे खाद्य मिळाले आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com