रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील वाद संपुष्टात येत सुनील तटकरे आणि भरत गोगावले एकत्र आले आहेत.
या घडामोडीनंतर रायगड जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता स्थापन झाली असून भाजपचा अध्यक्ष झाला आहे.
सत्तेसाठी झालेल्या राजकीय तडजोडीमुळे शिवसेनेने पालकमंत्रिपदाचा मुद्दा मागे घेतल्याची चर्चा सुरू आहे.
raigad guardian ministry politics : रायगडमधील विकोपाला गेलेला राष्ट्रवादी शिवसेनेतील वाद आता निवळला असून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले एकत्र आले आहेत. यामुळे रायगड जिल्हा परिषदेमध्ये महायुती सत्ता आली असून भाजपचा अध्यक्ष झाला आहे. या निमित्ताने जिल्ह्यासह राज्यात रायगडचा वाद संपल्याची चर्चा होत आहे. तसेच येथे तटकरेंनी खेळलेल्या खेळीसह शिवसेनेला जिल्हा परिषदेतील सत्तास्थापनेसाठी करावी लागलेल्या राजकीय तडजोड चर्चा होताना दिसत आहे. तर या तडजोडीमुळेच गोगावलेंनी पालकमंत्रिपदावरचा हक्क सोडला असून शिवसेनेचा पालकमंत्रिपदाचा मुद्दा मागे पडल्याचीही चर्चा होत आहे.
रायगड जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही शिंदे गटाच्या शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी मोठी राजकीय तडजोड करावी लागल्याचे समोर आले आहे. कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषद सत्तेत सहभागी होण्यासाठी शिवसेनेने पालकमंत्रिपदाचा मुद्दा मागे घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळावे, ही गेल्या चार वर्षांपासूनची इच्छा असलेल्या रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांना किमान काही काळ तरी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेबाबत राज्यस्तरावर जोरदार हालचाली सुरू होत्या. मंगळवारी रात्री झालेल्या चर्चेच्या अंतिम फेरीत विविध राजकीय समीकरणांवर सविस्तर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका ठाम ठेवत राजकीय दबाव कायम राखल्याचे सांगितले जाते.
शिवसेनेला सोबत न घेताही राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी भाजप, ठाकरे गट आणि काँग्रेसच्या सदस्यांना एकत्र येत ३८ सदस्यांचा निर्णायक आकडा गाठला होता. त्यामुळे सत्तास्थापनेत शिवसेनेची कोंडी निर्माण झाली होती. राजकीय समीकरणे हातातून जाऊ नयेत आणि जिल्हा परिषद सत्तेत सहभाग कायम ठेवावा, यासाठी अखेर शिवसेनेला नरमाईची भूमिका स्वीकारावी लागली.
सत्तेत सहभागी होण्यास शिवसेनेने सहमती दर्शवली असली तरी या तडजोडीचा परिणाम पालकमंत्रिपदाच्या समीकरणांवर झाल्याची चर्चा आहे. या घडामोडींमुळे भरत गोगावले यांच्या पालकमंत्रिपदाच्या शक्यता तात्पुरत्या कमी झाल्याचे मानले जात आहे.
विजयोत्सवाची जय्यत तयारी
शिवसेनेपेक्षा कमी सदस्य निवडुन येऊनही राष्ट्रवादीला जिल्हा परिषदेत सत्तेत आणि पालकमंत्रिपद मिळवण्याची दुहेरी संधी निर्माण झाली आहे. जरी मतपेटीत विजय मिळवता आला नसला तरी चर्चेच्या टेबलावर मिळवलेल्या यशामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते खूष आहेत. त्याचबरोबर भाजपला पहिल्यांदाच सत्तेत बसण्याची संधी मिळणार आहे.
1. रायगड जिल्हा परिषदेत सध्या कोणाची सत्ता आहे?
राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप यांच्या महायुतीची सत्ता स्थापन झाली आहे.
2. रायगडमधील राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील वाद का चर्चेत होता?
जिल्हा परिषद सत्तास्थापना आणि पालकमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद होते.
3. हा वाद कसा संपला?
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्या चर्चेनंतर दोन्ही पक्ष एकत्र आले.
4. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद कोणाला मिळाले?
महायुतीच्या सूत्रानुसार भाजपला अध्यक्षपद मिळाले आहे.
5. पालकमंत्रिपदाच्या मुद्द्यावर काय घडले?
राजकीय तडजोडीमुळे शिवसेनेने सध्या पालकमंत्रिपदाचा मुद्दा मागे घेतल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.