mahayuti raigad zilla parishad politics sarkarnama
कोकण

raigad politics : रायगड जिल्हा परिषदेचं सूत्र ठरलं! भाजपचा अध्यक्ष अन् शिवसेनेचा उपाध्यक्ष; बदल्यात सुनील तटकरेंनी राष्ट्रवादीसाठी काय मिळवलं?

mahayuti politics : अखेर रायगडच्या जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेचा तिढा सुटला असून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये महायुतीच असेल असा निर्णय झाला आहे.

Aslam Shanedivan

  1. रायगड जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी सुरू असलेला तिढा अखेर महायुतीच्या निर्णयामुळे संपुष्टात आला.

  2. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बैठकीत महायुतीची सत्ता स्थापन करण्याचा निर्णय झाला.

  3. या फॉर्म्युल्यानुसार पहिले सव्वा वर्ष भाजपचा अध्यक्ष तर शिवसेनेचा उपाध्यक्ष असणार आहे.

raigad zilla parishad News : रायगड जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेवरून तिढा वाढला होता. येथे भाजप-राष्ट्रवादीने शिवसेनेला बाजूला ठेवत सत्ता स्थापनेसाठी खेळी खेळली होती. आज याबाबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अलिबाग येथे निर्णय होणार होता. पण त्याआधीच जिल्ह्यात महायुतीच असेल असा निर्णय मुंबईत झालेल्या बैठकीत झाला. यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री भरत गोगावले यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निर्णया प्रमाणे रायगड जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी-भाजप-शिवसेनेची सत्ता येणार आहे. तर पहिले सव्वा वर्ष भाजपचा अध्यक्ष होणार आहे. तसेच उपाध्यक्ष शिवसेनेचा होईल असा निर्णय झाल्याचे समोर येत आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तेत कोण बसणार, याचे गूढ शेवटच्या क्षणापर्यंत कायम असून शिवसेनेचे दबावतंत्र वाढवत राज्यातील युतीप्रमाणेच जिल्ह्यातही महायुती रहावी यासाठी प्रयत्न केले होते. याप्रमाणे उपमुख्यमंत्री शिंदे, मंत्री भरत गोगावले, मंत्री उदय सामंत यांच्यासह शिवसेनेच्या जिल्ह्यातील आमदारांनी राजकीय मुत्सद्देगीरी दाखवत राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनीच यात लक्ष घालावे अशी विनंती केली होती.

पण भाजप-राष्ट्रवादीने याकडे लक्ष न देत सत्ता स्थापनेसाठी पडद्यामागे राजकीय घडामोडी वेगाने नेत अलिबागमध्ये मुहूर्त साधला होता. उद्या गुरुवारी (ता. १२) येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. येथे सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला सत्तेच्या सारीपाटापासून दूर ठेवत युतीची घोषणा होणार होती. तर शिवसेनेकडून वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेत मुख्यमंत्री कोणता निर्णय घेतात याकडे लक्ष होते. यासर्व घडामोडींमुळे येथील राजकीय वातावरण तापले होते.

दरम्यान रायगड जिल्हा परिषदेत महायुती सत्तेत बसणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे. मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री, उद्योग मंत्री उदय सामंत आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात झालेल्या बेठकीत रायगड जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेवर तोडगा काढण्यात आला. यगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद भाजपकडे तर सर्वात जास्त जागा मिळवणाऱ्या शिवसेनेला उपाध्यक्ष पद देण्यात आले आहे. याच प्रमाणे जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्ये देखील सत्तेची पद वाटून घेतली जाणार असल्याची माहिती आहे.

यामुळे आता रायगड जिल्हा परिषदेत पहिली सव्वा वर्ष भाजपचा अध्यक्ष होणार असून अडीच वर्षे शिवसेनेला देण्यात आली आहेत. तर सव्वा वर्षे राष्ट्रवादीचा अध्यक्ष होईल. सध्या जिल्हा परिषदेच्या भाजप पहिल्यांदाच सत्तेत येत असून, भाजपचे वैकुंठ पाटील यांची अध्यक्षपदासाठी नाव चर्चेत आहे.

पक्षीय बलाबल आणि मॅजीक फिगर

५९ सदस्य संख्या असलेल्या रायगड जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी ३१ सदस्यांची गरज असून ही मॅजीक फिगर याधीच राष्ट्रवादी-भाजपने गाठली आहे. येथे सत्ता स्थापनेसाठी ३४ सदस्य राष्ट्रवादी-भाजप होते. आता यात सर्वाधिक जागा असणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेची भर पडणार आहे. रायगड जिल्हा परिषदेत सर्वाधिक २१ सदस्य शिंदेंच्या शिवसेनेचे असून राष्ट्रवादी काँग्रेस-१६, भाजपचे १५ सदस्य विजयी झाले आहे. तसेच ठाकरेंच्या शिवसेनेचे ०५ तर काँग्रेसचे ०२ सदस्य आहेत.

FAQs :

1. रायगड जिल्हा परिषदेत अखेर कोणाची सत्ता येणार आहे?
महायुती म्हणजे भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांची सत्ता स्थापन होणार आहे.

2. अध्यक्षपद कोणाला मिळणार आहे?
पहिल्या सव्वा वर्षासाठी भाजपचा अध्यक्ष होणार असल्याचे समोर आले आहे.

3. उपाध्यक्षपद कोणत्या पक्षाकडे जाणार आहे?
उपाध्यक्षपद शिवसेनेला देण्याचा निर्णय झाल्याचे बोलले जात आहे.

4. हा निर्णय कुठे आणि कसा झाला?
मुंबईत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हा अंतिम निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

5. या निर्णयामागे कोणाच्या प्रयत्नांना यश मिळाले?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री भरत गोगावले यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT