ZP president selection : महायुतीत नवा सत्तेचा गेम! राष्ट्रवादी-भाजप समीकरणात शिंदेंना धक्का; झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी दावेदार सज्ज

raigad zilla parishad president election : रायगड जिल्‍हा परीषदेत सत्तास्थापनेचा तिढा कायम असून तो सोडविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे. फडणवीस यांनी याबाबत बैठक घेतल्याने काय निर्णय होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
raigad zilla parishad Politics
raigad zilla parishad Politicssarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी १२ मार्च रोजी बैठक होणार आहे.

  2. देवेंद्र फडणवीस यांनी उदय सामंत आणि सुनील तटकरे यांच्यासोबत चर्चा केली असली तरी निर्णय जाहीर झालेला नाही.

  3. शिवसेना सर्वाधिक जागा जिंकूनही सत्तेबाहेर राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Raigad News : रायगड जिल्‍हा परीषदेतील सत्तास्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून प्रशासनानेही तयारी सुरू केली आहे. जिल्‍हा परीषदेचा नवीन अध्‍यक्ष व उपाध्‍यक्ष निवडीचा कार्यक्रम जिल्‍हाधिकारी किशन जावळे यांनी जाहीर केला आहे. 12 मार्च रोजी या निवडीसाठी बैठक आयोजित करण्‍यात आली आहे. त्‍यामुळे जिल्‍हा परिषदेत कुणाची सत्ता येणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

मात्र भाजप-राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील ताणलेल्या संबंधामुळे येथे तिढा कायम असून तो सोडविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे. फडणवीस यांनी याबाबत उदय सामंत व सुनील तटकरे यांची बैठक घेतली. पण अद्याप बैठकीत कोणता निर्णय झाला हे समोर आलेले नाही. यामुळे शिवसेना एकाकी पडल्याचे चित्र असून सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याची रणनीती राष्ट्रवादी आणि भाजपची यशस्वी होताना दिसत आहे. तर फडणवीस यांनी हस्तक्षेप केला नाही तर शिवसेनेला विरोधी पक्षात बसावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रायगड जिल्हा परिषदेचा निकाल लागून जवळपास २० दिवस होत आहेत. तरी येथे सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. भाजप आणि राष्ट्रवादी आघाडीकडे बहुमत असून सत्ता स्थापनेसाठी घडामोडी जलद झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या ५९ जागांपैकी सर्वाधिक २१ जागा शिवसेनेने जिंकल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसने १६, भाजपने १५ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे या आघाडीकडे बहुमत आहे. मात्र, महायुतीमधील सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याची खेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आखली आहे. तर सत्तेच्या पटलावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला (०५) घेण्याचा त्यांचा मानस आहे. येथे काँग्रेसने ०२ जागा जिंकल्या आहेत.

raigad zilla parishad Politics
Zilla Parishad Election : सुप्रीम कोर्टातून महाराष्ट्रासाठी मोठी अपडेट; नाशिक, बीड, नागपूरसह 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे फटाके दिवाळीतच?

भाजप-राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील ताणलेल्या संबंधामुळे जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापने अडथळा येत असून महायुतीमधील वाद वाढण्याची शक्यता आहे. यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना यात यश आलेले नाही. यानंतर हा वाद थांबविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे. फडणवीस यांनी सामंत आणि तटकरे यांच्यात विधीमंडळात बैठक घेतली. पण या बैठकीत कोणता निर्णय झाला हे अद्याप उघड झालेले नाही. पण निवडणुकीनंतर भाजप-राष्ट्रवादीच्या नेते शिवसेनेच्या विरोधात असल्याचे दिसत असून जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनेची साथ नकोच अशी भूमिका अनेक नेत्यांनी घेतली आहे. तर अध्यक्ष भाजपचाच बसणार अशीच भूमिका देखील घेतली आहे.

दरम्यान ग्रामविकास विभागाने जिल्‍हा परीषदेच्या अध्‍यक्ष उपाध्‍यक्ष निवडीच्या संदर्भात पत्रक काढत 20 मार्च पूर्वी जिल्‍हा परीषद सदस्‍यांची पहिली बैठक घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अध्‍यक्ष उपाध्‍यक्ष पदाची निवड प्रक्रिया पूर्ण करावी असेही जिल्‍हाधिकाऱ्यांना बजावले आहे. यामुळे जिल्‍हा परीषदेच्‍या नवनिर्वाचित सदस्‍यांची पहिली बैठक 12 मार्च रोजी होणार असून याच बैठकीत अध्‍यक्ष उपाध्‍यक्ष यांची निवड होणार आहे.

पं. स. सभापती निवड

रायगड जिल्‍ह्यातील 15 पंचायत समितीच्‍या सभापती, उपसभापती निवडीचा कार्यक्रमदेखील जाहीर करण्‍यात आला आहे. जिल्‍हाधिकारी यांनी जाहीर केलेल्‍या कार्यक्रमाप्रमाणे पंचायत समिती सभापती आणि उपसभापती निवडीसाठी 11 मार्च रोजी विशेष सभांचे आयोजन करण्‍यात आले आहे. यात निवड झालेल्‍या सभापतींना 12 मार्च रोजी होणाऱ्या जिल्‍हा परिषदेच्‍या पहिल्‍या सभेला उपस्थित राहता येणार आहे.

भाजपकडून प्रमुख दावेदार

तटकरे आणि खासदार धैर्यशील पाटील यांच्या युतीच्या घोषणेनंतर भाजपचे नेते अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी देखील जिल्हा परिषदेत भाजपचाच अध्यक्ष होईल असा दावा केला. तसेच त्यांनी अलिबाग विधानसभा मतदारसंघात २०२९ ची निवडणूक भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढवेल, अशी घोषणा करत थेट शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनाच आव्हान दिले आहे. या घोषणेमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता असता भाजपकडून वैकुंठ रविंद्र पाटील अध्यक्षपदासाठी प्रमुख दावेदार असल्याची चर्चा आहे. त्यांची गटनेतेपदी निवड झालेली आहे.

राष्ट्रवादीच्या वाट्याला उपाध्यक्ष पद

जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनेची साथ नकोच अशी भूमिका भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली आहे. तर भाजप-राष्ट्रवादीच्या युतीची घोषणा केली आहे. यामुळे येथे कमळ आणि घड्याळ एकत्र येणार असून राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेच्या वाट्यात उपाध्यक्ष पद मिळणार आहे. राष्ट्रवादीकडून मधुकर पाटील प्रमुख दावेदार आहेत.

अद्याप भूमिका नाहीच

एकीकडे तटकरे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाच सदस्यांचा गट आपल्या सोबत असल्याचे सांगत असून त्यांना सत्तेत घेणार असल्याची माहिती देत आहेत. पण याबाबत शिवसेनेच्या सदस्यांकडून कोणतीच अधिकृत घोषणा झालेली नाही. पण येथील राजकीय जाणकार हे सदस्य सत्ताधाऱ्यांसोबत जातील अशी शक्यता व्यक्त करत आहेत.

raigad zilla parishad Politics
Pune Zilla Parishad election: पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत; महायुतीसोबत नको, एकहाती सत्ता स्थापन करणार ?

FAQs :

1. रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष निवड कधी होणार आहे?
१२ मार्च रोजी विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.

2. मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोणासोबत बैठक घेतली?
उदय सामंत आणि सुनील तटकरे यांच्यासोबत चर्चा झाली.

3. बैठकीत अंतिम निर्णय झाला का?
अद्याप कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही.

4. शिवसेनेची सध्याची स्थिती काय आहे?
सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेना सत्तेबाहेर राहण्याची शक्यता आहे.

5. पुढील राजकीय घडामोडी कशा असू शकतात?
मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपावर आणि आघाडीतील समन्वयावर पुढील समीकरण अवलंबून असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com