रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महायुतीने मोठी मुसंडी मारली आहे.
नडगाव बिरवाडी गटातून मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले विजयी झाले.
अलिबागमध्ये मानसी दळवी यांच्या विजयामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदाची चर्चा सुरू झाली आहे.
Raigad ZP Election News : कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांचे निकाल समोर येत आहेत. या दरम्यान महाड आणि अलिबाग या मतदारसंघांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असतानाच येथून शिवसेनेसाठी मोठ्या विजयाची माहिती येत आहे. येथील नडगाव बिरवाडी या प्रतिष्ठेच्या गटातून राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यापाठोपाठ अलिबागमध्ये आमदार महेंद्र दळवींच्या पत्नी मानसी दळवी यांनी देखील विजयाचा चौकार मारला आहे. यामुळे जिल्ह्यात शिवसेनेच्या विजयाचा धमाका पाहायला मिळत आहे.
महाड राडा प्रकरणात जामिनावर असलेले मंत्री भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. त्यांच्या या विजयामुळे रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी महाड तालुक्यातील नाडगावतर्फे बिरवाडी मतदारसंघाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. विकास गोगावलेंनी प्रतिस्पर्ध्याला धूळ चारताच गोगावलेंच्या समर्थकांनी गुलाल उधळ एकच जल्लोष केला.
दरम्यान अलिबागमध्ये देखील आमदार महेंद्र दळवींच्या पत्नी मानसी दळवी यांनी विजयाचा चौकार मारला आहे. अलिबागच्या थळ जिल्हा परिषद मतदारसंघातून मानसी दळवी यांनी ६,००० मतांच्या फरकाने प्रतिस्पर्ध्याला धूळ चारली आहे. मानसी दळवी यांचा हा सलग चौथा विजय असून त्यांची जिल्हा परिषदेतील ही चौथी टर्म ठरणार असून गेल्या १५ वर्षांपासून त्या जिल्हा परिषदेच्या राजकारणात आहे.
आता विजयानंतर रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव आघाडीवर असून, जिल्ह्याच्या पहिल्या नागरिक म्हणून त्यांच्या गळ्यात माळ पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच जिल्ह्यात राष्ट्रवादीनेही (अजित पवार गट) खाते उघडले असून तीन जागांवर विजय मिळवला आहे. ज्यामध्ये अमित नाईक यांच्यासह दोन उमेदवारांचा समावेश आहे.
1. रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत कोण जिंकले?
महायुतीने या निवडणुकीत आघाडी घेत मोठा विजय मिळवला आहे.
2. विकास गोगावले कुठून निवडून आले?
विकास गोगावले हे नडगाव बिरवाडी गटातून विजयी झाले आहेत.
3. अलिबागमध्ये कोणाचा विजय झाला?
अलिबाग मतदारसंघातून मानसी दळवी यांनी विजय मिळवला आहे.
4. या निकालाचे राजकीय महत्त्व काय आहे?
महाड आणि अलिबाग हे प्रतिष्ठेचे मतदारसंघ असल्याने निकालाला राज्यभर महत्त्व आहे.
5. जिल्हा परिषद अध्यक्षपदावर कोणाची शक्यता आहे?
मानसी दळवी यांच्या विजयामुळे अध्यक्षपदाच्या शर्यतीत त्यांचे नाव आघाडीवर मानले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.