Raigad Politics : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संधेला गोगावलेंना न्यायालयाचा मोठा दिलासा, मुलगा विकास गोगावलेंबाबत दिला महत्त्वाचा निर्णय

Mahad Municipal Election Violence : महाड नगरपालिका निवडणुकीतील गोंधळ प्रकरणात न्यायालयाने शिवसेना नेते मंत्री भरत गोगावले यांना मोठा दिलासा दिला आहे.
Mahad Election Clash, Minister Bharat Gogawale Son Vikas Gogawale
Mahad Election Clash, Minister Bharat Gogawale Son Vikas Gogawale sarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. महाड नगरपालिका निवडणूक राडा प्रकरणात मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना जामीन मंजूर झाला आहे.

  2. शिवसेनेच्या 8 आरोपींना जामीन देण्यात आला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

  3. या निर्णयामुळे महाडमधील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

Bharat Gogavale sun Vikas Gogavale bail News : शिवसेना नेते तथा मंत्री भरत गोगावले यांना महाड नगरपालिका निवडणुकीतील राड्या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. राडा प्रकरणात दोन दिवसांची पोलिस कोठडीत पाठवलेल्या पुत्र विकास गोगावलेंना जामीन मंजूर करण्यात आला आहे. विकास गोगावले यांच्यासह शिवसेनेच्या ८ आरोपींनादेखील जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५ आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संधेला गोगावले यांना दिलासा मिळाल्याची सध्या रायगड जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे.

महाड नगरपालिका निवडणुकीतील राडा प्रकरणानंतर मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले फरार झाले होते. तर उच्च न्यायालयाने थेट महायुती सरकारचे कान टोचत पोलिसांना फटकारले होते. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याच मुंत्र्यांच्यापुढे हतबल आणि असाह्य असल्याचे म्हटले होते. तर गोगावले यांना फटकारत मुलास २४ तासात हजर करण्याचे आदेश देत झापले होते.

ज्यानंतर शुक्रवारी महाड मारहाण प्रकरणी विकास गोगावलेंसह शिवसेनेच्या ८ जण पोलिसांना शरण गेले होते. याच वेळी राष्ट्रवादीचे ५ संशयीत आरोपी देखील महाड शहर पोलीस ठाण्यात शरणागती पत्कारली होती. या सर्वांचा वैद्यकीय तपासणी केल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही गटातील १३ आरोपी न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती, जी आज संपली.

Mahad Election Clash, Minister Bharat Gogawale Son Vikas Gogawale
Raigad Politics : पनवेल पंचायत समितीत सत्तासंघर्ष! भाजपची लाट की शेकाप गड राखणार? पक्षांतराचा खेळ निर्णायक ठरणार

यादरम्यान आज झालेल्या सुनावणीत महाड मारहाण प्रकरणी विकास गोगावलेंसह शिवसेनेच्या ८ जणांना जामीन मंजूर करण्यात आलाय. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५ आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

अखेर जामीन मिळाला...

महाड नगरपालिका निवडणुकीदरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुबंळ हाणामारी झाली होती. या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते. ज्यानंतर विकास गोगावलेंसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फरार होते. यादरम्यान दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी न्यायालयात अटक पूर्व जमिनासाठी धाव घेतली होती. या प्रकरणात माणगाव सत्र न्यायालयाने या सर्वांचे अटकपूर्व जामीन फेटाळले होते. ज्यानंतर विकास गोगावले यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

त्यावेळी न्यायालयाने आरोपींचा अटकपूर्व जामीन नाकारत सरकारलाच फटकारतं कान उघडणी केली होती. मंत्र्यांची मुले गुन्हा करून मोकाट फिरतात, ते मंत्र्यांच्या संपर्कात राहतात, पण पोलिसांना ते सापडत नाहीत. राज्यात कायदा, सुव्यवस्था आहे का नाही? मुख्यमंत्री या प्रकरणी गप्प का? ते इतके हतबल आहेत का ते मंत्र्यांविरोधात बोलू शकत नाहीत? अशा प्रकारचे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाने ओढले होते. यानंतर विकास गोगावले यांनी शुक्रवारी सकाळी १०.३० च्या दरम्यान पोलीस ठाण्यात हजर झाले होते. पण आता न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला असून विकास गोगावले बाहेर आले आहेत.

Mahad Election Clash, Minister Bharat Gogawale Son Vikas Gogawale
Raigad Politics : तटकरे–गोगावलेंच्या वादाचा फटका 'जिप'ला ? आरोप-प्रत्यारोपात फक्त एक अर्ज दाखल

FAQs :

1) विकास गोगावले यांना जामीन मिळाला का?
👉 होय, महाड नगरपालिका निवडणूक राडा प्रकरणात विकास गोगावले यांना जामीन मंजूर झाला आहे.

2) किती आरोपींना जामीन मिळाला?
👉 शिवसेनेच्या एकूण 8 आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

3) राष्ट्रवादी काँग्रेसच्या आरोपींना काय शिक्षा झाली?
👉 राष्ट्रवादी काँग्रेसच्या 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

4) महाड राडा प्रकरण काय आहे?
👉 महाड नगरपालिका निवडणुकीदरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हिंसाचाराशी संबंधित हे प्रकरण आहे.

5) या प्रकरणाचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
👉 या निर्णयामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com