Raj Thackeray sarkarnama
कोकण

Raigad Politics : शिवसेनेनं ताकद लावलेलं पालकमंत्रिपद राज ठाकरेंसाठी 'फालतू' गोष्ट : रायगडच्या वादावरून फडणवीस सरकारला सुनावलं

Raj Thackeray On Raigad Guardian Minister Post : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कोकण दौरा केला. यावेळी त्यांनी सरकारवर जबरदस्त टोलेबाजी केली. तसेच रायगडच्या पालकमंत्रिपदावरून खोचक टीका देखील केली आहे.

Aslam Shanedivan

MNS Politics : "पालकमंत्री पदावरून वाद होणे ही मला फालतू गोष्ट वाटते. अत्यंत फालतू गोष्ट आहे पालकमंत्री. पालक म्हणजे कोण आई-बाप ना? त्यांना आई-बाप मानायचे का? असं म्हणत कोकण दौऱ्यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पालकमंत्रिपदावरून खोचक टीका केली आहे. तसेच त्यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदावरून सरकारला सल्ला देखील दिला आहे.

पालकमंत्रिपदावरून महायुतीचे नेते चर्चा सुरू असल्याचे सांगत आहेत. तर खुद्द शिवसेना नेते तथा मंत्री भरत गोगावले हे याचा निर्णय 15 ऑगस्टच्या आधी होईल, असा दावा करत आहेत. दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत आणि गृह राज्यमंत्री योगेश कदम देखील यावर दावा करताना गोगावलेच रायगडचे पालकमंत्री होतील, असे सांगत आहेत. एकीकडे शिवसेनेचे दिग्गज नेते आणि स्थानिक आमदार गोगावलेंसाठी जोरदार फिल्डिंग लावताना दिसत आहेत.

दुसरीकडे राज ठाकरे यांनी पालकमंत्रिपदावरून सुरू असलेला वाद हा क्षुल्लक असल्याचं म्हणत सरकारला टोला लगावला आहे. "पालकमंत्री पदावरून वाद होणे ही मला फालतू गोष्ट वाटते. अत्यंत फालतू गोष्ट आहे पालकमंत्री. पालक म्हणजे कोण आई-बाप ना? त्यांना आई-बाप मानायचे का?" तसेच सरकारने निर्णय घेऊन नागरिकांचं हित सांभाळलं पाहिजे, असा सल्लाही दिला आहे.

"माझं म्हणणं आहे की सरकार नावाची एक गोष्ट असते, सरकारने या गोष्टींचे निर्णय घ्यायचे असतात. सरकारने आपल्या लोकांचं जे काही हित आहे ते सांभाळायचं असतं. हे काय पालकमंत्र्याचं काम नाहीये," असे म्हणत सरकारवर रखडलेल्या पालकमंत्रिपदावरून आणि सुरू असणाऱ्या वादावरून टीका केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT