Bharat Gogawale : तटकरेंचा मोठा डाव? भरत गोगावले यांच्या विरोधकाला राजकीय बळ; ठाकरेंना सोडून राष्ट्रवादीत आलेल्या नेत्याला मोठं पद

Snehal Jagatap appointed Raigad Lok Sabha President by NCP : कोकणातील राजकीय वर्तुळात घडामोडी होताना दिसत असून महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल माणिकराव जगताप यांना राष्ट्रवादीने मोठी जबाबदारी दिली आहे.
Raigad Politics; Bharat Gogawale
Raigad Politics; Bharat Gogawalesarkarnama
Published on
Updated on

Raigad Political News : महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी अचानक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यामुळे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एकाच दगडात अनेकांची शिकार केल्याची चर्चा झाली होती. आता याच स्नेहल जगताप यांना राष्ट्रवादीकडून रायगड जिल्ह्यात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांची रायगड लोकसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. स्नेहल जगताप या मंत्री तथा शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांच्या कट्टर विरोधक मानल्या जातात. यामुळे आता गोगावले यांच्या कट्टर विरोधकाला राष्ट्रवादीकडून राजकीय बळ दिले जात असल्याचे समोर आले आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागली असतानाच मंत्री गोगावले यांच्याविरोधात लढलेल्या स्नेहल माणिकराव जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. एकीकडे भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चा सुरू असतानाच त्यांनी ठाकरेंची साथ सोडत सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत जाण्याचा मार्ग निवडला होता. यामुळे गेल्या वर्षी या प्रवेशाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली होती. तर तटकरेंना गोगावले यांच्या विरोधात तगडा चेहरा मिळाल्याचे बोलले जात होते.

दरम्यान, आता रायगडच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडताना दिसत असून स्नेहल जगताप यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रायगड लोकसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी याबाबत नियुक्तीपत्र दिले आहे. नियुक्तीपत्र प्रदान करताना मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, सुधाकर घारे, निलेश महाडिक, पांडूशेठ निवाते यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Raigad Politics; Bharat Gogawale
Bharat Gogawale : रायगडचे राजकीय तापमान वाढले, पालकमंत्रीपदावर गोगावलेंचे सूचक वक्तव्य चर्चेत; 'मला ग्रीन सिग्नल'

स्नेहल जगताप यांनी महाडच्या नगराध्यक्षा म्हणून चांगली कामगिरी केली असून जनतेसमोरील अडचणींच्या काळात त्यांनी कडक भूमिका घेतली होती. तर भाजपमध्ये प्रवेशाबरोबरच शिंदेंच्या शिवसेनेत त्यांच्या प्रवेशाच्या जोरदार चर्चा सुरू असतानाच त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

यानंतर आता पक्षसंघटना अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने तटकरे यांनी त्यांच्यावर रायगड लोकसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. यामुळे महाड, श्रीवर्धन, अलिबाग, पेण, गुहागर आणि दापोली या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी अधिक भक्कम होण्यास संधी मिळणार आहे.

यावेळी स्नेहल जगताप यांनी, "उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांत पक्षवाढीसाठी प्रयत्नशील राहीन," अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Raigad Politics; Bharat Gogawale
Bharat Gogawale : 'MLC'च्या जागेवरून महायुतीत डिल? गोगावलेंच्या पालकमंत्री पदाच्या वक्तव्याने चर्चांना उधाण; अखेर हायव्होल्टेज ड्रामा संपला?

भरत गोगावले हे महाडचे विद्यमान आणि चार वेळा आमदार राहिलेले मातब्बर नेते असून स्नेहल जगताप या महाडचे दिवंगत काँग्रेस आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या आणि माजी नगराध्यक्षा आहेत. त्यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता आणि निवडणूक लढवत गोगावले यांना जोरदार टक्कर दिली होती. मात्र, गोगावले यांनी १,१७,४४२ मते मिळवत स्नेहल जगताप यांचा तब्बल २६,२१० मतांच्या फरकाने पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी ठाकरेंची साथ सोडत राष्ट्रवादीत प्रवेश केला. या प्रवेशानंतर रायगडमध्ये भरत गोगावले यांच्या अडचणी वाढतील, अशी चर्चा सुरू झाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com