Uddhav thackeray, Rajan Salvi  sarkarnama
कोकण

Rajan Salvi : बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक म्हणवणाऱ्या राजन साळवींनी 24 तासांत बदलली भूमिका? म्हणाले,'योग्यवेळी...'

Rajan Salvi Shivsena Mahayuti : साळवी हे भाजपमध्ये येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी साळवी जर भाजपमध्ये आले तर त्यांचे स्वागत करू असे म्हटले होते.

Roshan More

Rajan Salvi News: राजपूर मतदारसंघातून पराभूत झालेले आमदार राजन साळवी हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, या सगळ्या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचे साळवी यांनीच स्पष्ट केले. तसेच मी बाळासाहेबांचा कडवड शिवसैनिक आहे. पराभवाचं दुःख माझ्यासह मतदारसंघातील जनतेला आहे. भाजपा किंवा शिंदे गटाच्या वाटेवर आहे, असे म्हटले जात आहे पण तसं काही नाही. मी शिवसेनेसोबतच आहे.'

राजन साळवी यांच्या या वक्तव्यामुळे ते उद्धव ठाकरेंसोबत कायम राहणार असल्याच्या सांगितले जाते होते. मात्र, त्यांच्या या वक्तव्याला 24 तास होण्याच्या आधीच साळवी यांनी माध्यमांसमोर बोलताना म्हटले की 'मी योग्यवेळी योग्य निर्णय घेईन'

राजन साळवींच्या योग्यवेळी योग्य निर्णय घेईल या वक्तव्याच्या उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. साळवी हे भाजपमध्ये येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी साळवी जर भाजपमध्ये आले तर त्यांचे स्वागत करू असे म्हटले होते.

राजन साळवी हे आपल्या परावभवाला पक्षातील वरिष्ठ मंडळांनी कारणीभूत ठरवले आहे. ते म्हणाले पराभवासाठी कारणीभूत असलेल्यांची नावे आपण घेऊ इच्छित नाही, असे ते म्हणाले.

'मी राजापूर येथे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्याठिकाणी उपस्थितांनी भावना व्यक्त केल्या राजन साळवी तुमच्यावर अन्याय झाला आहे. तुमच्या पराभवाला अनेक मंडळी जबाबदार आहेत. आणि तुम्ही योग्य तो निर्णय घ्या. अशा तऱ्हेच्या भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. मी त्यांना सांगितले योग्य वेळी योग्य निर्णय घेईल', असे राजन साळवी म्हणाले.

साळवींचे महायुतीमध्ये स्वागत

महाराष्ट्रातील वातावरण काय आहे हे महाविकास आघाडीतील पराभूत उमेदवारांना माहिती आहे. त्यामुळे ते महायुतीमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत. आता महायुती 15 वर्ष हालणार नाही. राजन साळवी जर महायुतीमध्ये येणार असतील तर त्यांचे स्वागत आहे, असे गृहराज्यमंत्री योगेश जाधव म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT