Santosh Deshmukh murder case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट; फरार आरोपींना मदत करणाऱ्या तिघांना एसआयटीनं उचललं

SIT action Beed News : या प्रकरणी दोन दिवसापूर्वी एसआयटी नेमल्यानंतर तपासाला वेग आला आहे. या प्रकरणातील फरार असलेल्या तीन आरोपींना आयपीएस बसवराज तेली यांच्या नेतृत्वातील एसआयटीने ताब्यात घेतले आहे.
Santosh Deshmukh
Santosh DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Beed news : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. या हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून सुरु आहे. या प्रकरणी दोन दिवसापूर्वी एसआयटी नेमल्यानंतर तपासाला वेग आला आहे. या प्रकरणातील फरार असलेल्या तीन आरोपींना आयपीएस बसवराज तेली यांच्या नेतृत्वातील एसआयटीने ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या तिघांनी या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे याच्यासह सुधीर सांगळेला फरार होण्यात मदत केल्याचा संशय आहे.

धारूरच्या कासारीतून डॉ. संभाजी वायबसे यांच्यासह दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या तीनही संशयित आरोपींची दीड तासांपासून कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीदरम्यान अनेक खुलासे होण्याची मोठी शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Santosh Deshmukh
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्याप्रकरण पोहचले दिल्ली दरबारी; खासदार सोनवणेंनी केली 'त्या' दोन पोलिस अधिकाऱ्यांची तक्रार

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून सुरु आहे. सीआयडीकडून (CID) युद्ध पातळीवर तपास सुरु आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात सीआयडीने 100 पेक्षाही जास्त जणांचा जबाब नोंदवला आहे. तसेच या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यालाही अटक केली. वाल्मिक कराड याच्यावर गंभीर आरोप आहेत. या प्रकरणात सीआयडीने आरोपींच्या फोनची कॉल हिस्ट्री, सीडीआर तपासला आहे.

Santosh Deshmukh
Santosh Deshmukh Murder case : एसआयटीचे पथक ॲक्शन मोडवर; केजमध्ये दाखल होताच उचलले मोठे पाऊल

सीआयडीला आरोपींच्या स्कॉर्पिओ गाडीतून मोबाईलदेखील सापडले आहेत. त्या मोबाईलमधून व्हिडीओ देखील प्राप्त झाल्याची चर्चा आहे. पण असं असलं तरीही तपासात आतापर्यंत काय-काय पुरावे मिळाले, याबाबत पूर्ण तपास होत नाही तोपर्यंत खुलासा होणार नाही. या प्रकरणात सीआयडीचा युद्ध पातळीवर तपास सुरु आहे.

Santosh Deshmukh
BJP Leader Claims : काँग्रेससह सर्वच पक्षातील नेते आमच्याकडे येण्यासाठी नंबर लावून बसलेत; भाजपच्या बड्या नेत्याचा दावा

दरम्यान, या प्रकरणी सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून सुरु असताना बुधवारी या प्रकरणी राज्य सरकरकडून एसआयटीही स्थापन करण्यात आली. सीआयडी अधिकाऱ्यांची संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांनी भेट घेतली. सीआयडीकडून सध्या युद्धपातळीवर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सुरू असून आतापर्यंत दीडशेहून अधिक जणांची या प्रकरणात चौकशी करण्यात आली आहे.

Santosh Deshmukh
Ajit Pawar Decision : बीडच्या पालकमंत्रिपदाचा सस्पेन्स संपणार; मुंबईत दाखल होताच अजित पवार घेणार निर्णय

दरम्यान, संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी केज पोलिस ठाण्यात सुदर्शन चंद्रभान घुले, कृष्णा शामराव आंधळे, सुधीर ज्ञानोबा सांगळे, महेश सखाराम केदार, जयराम माणिक चाटे, प्रतिक भीमराव घुले, विष्णू महादेव चाटे या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या आरोपींपैकी पोलिसांनी महेश केदार, जयराम चाटे, प्रतिक घुले, विष्णू चाटे या चौघांना आधीच अटक केली आहे. तर मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे हे तिघे फरार होते. त्यांना पकडून देणाऱ्यांना पोलिसांनी बक्षीस जाहीर केलं होतं. त्यानुसार आता घुले आणि सांगळेला पोलिसांनी अटक केली असली तरी कृष्णा आंधळे अद्याप फरार असल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com