Sindhudurg District Bank; Rajan Teli sarkarnama
कोकण

राजन तेलींचा जिल्हा बँकेवर पुन्हा एकदा आरोप! दबंगशाही म्हणत थेट अध्यक्षांविरोधातच दंड थोपाटले

Rajan Teli’s Allegation Over Sindhudurg District Bank : शिंदेंच्या शिवसेनेचे नेते राजन तेली यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवरून पालकमंत्री नितेश राणेंना टार्गेट करत कोकणात खळबळ उडवून दिली होती.

Aslam Shanedivan

  1. सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेतील कर्ज वाटपावरून माजी आमदार राजन तेली यांनी गंभीर आरोप केले आहेत.

  2. बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी दबंगशाही केल्याचा दावा त्यांनी केला.

  3. या आरोपांमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले असून सहकारी बँकेच्या प्रतिष्ठेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेतील कर्ज वाटपावरून शिंदेंच्या शिवसेनेचे नेते माजी आमदार राजन तेली यांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावेळी त्यांनी बँकेच्या कर्जप्रक्रियेत बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी दबंगशाही केल्याचा आरोप केला आहे. तर या चुकीच्या कर्ज वितरणामुळे सहकारी संस्थेची प्रतिष्ठा धोक्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या आरोपामुळे आता जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे.

राजन तेली यांनी जिल्हा बँकेच्या कर्जप्रक्रियेत गडबड सुरू असून कर्जवाटप व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा दावा केला आहे. हे आरोप त्यांनी आज सोमवारी (दि.१५) कणकवली येथील आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी त्यांनी बँकेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवले आहे.

तसेच तातडीने बँकेचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळ बरखास्त करावे, अशीही मागणी त्यांनी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे केल्याचे सांगत आपण लवकरच याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

यावेळी राजन तेली यांनी, बँकेचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाने या व्यक्तीला वेगवेगळ्या माध्यमातून तब्बल 59 कोटी रूपये कर्ज दिले असून त्याने तारण ठेवलेली जमिनीची किंमत 88 लाख रुपये असून ही प्रकरणच अत्यंत संशयास्पद असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तर अशा अनेक कर्जांमुळे सहकारी संस्थेच्या मुळ तत्वाला हानी पोहोचेल असा दावा त्यांनी केला असून बँक टिकली पाहिजे अशी आमची प्रामाणिक इच्छा असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. तर जिल्ह्यातील 234 पतसंस्था आणि जवळपास हजारो सभासद यांचे मोठे नुकसान होईल असाही दावा त्यांनी केला आहे.

राजन तेली यांनी चार वर्षांचे कर्ज व्यवहार तपासण्याची मागणी करताना व्यवहारांची चौकशी करून गडबडी रोखावी, अशीही मागणी केली आहे. त्यांनी, यशवंत सहकारी बँकेप्रमाणेच बँकेची लूट करणाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल होणे आवश्यक असल्याचे सांगत पोलिसांमार्फत चौकशी करावी असेही त्यांनी म्हटलं आहे. तर यावेळी त्यांनी, वेंगुर्ला तालुक्यातील भोगवे येथील एका गोठ्याचा मुद्दे पुढे आणत त्याची किंमत 31 कोटी रुपये दाखवल्याचेही सांगत शेतीच्या साहित्याच्या वाटप करण्यात आलेल्या पैशांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

त्याचबरोबर राजन तेली म्हणाले की, आमच्याकडे या आरोपांचे पुरावे असून याबाबत अनेक वेळा तक्रारी देखील केल्या आहेत. पण सहकार खाते आणि नाबार्ड यांच्याकडून कोणतीच कारवाई झाली नाही. फक्त बँकेला दोन लाखांचा दंडही झाला. मात्र आता यामध्ये योग्य ती कारवाई करण्याबाबत दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली आहे. गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांही भेटू. त्यानंतरही कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करू, असाही इशारा दिला आहे.

FAQs :

1. राजन तेली यांनी नेमके कोणते आरोप केले आहेत?
➡️ जिल्हा सहकारी बँकेच्या कर्ज प्रक्रियेत दबंगशाही आणि चुकीचे कर्ज वाटप झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

2. आरोप कुणावर करण्यात आले आहेत?
➡️ बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी आणि सीईओ प्रमोद गावडे यांच्यावर हे आरोप आहेत.

3. या कर्ज वाटपामुळे काय परिणाम होऊ शकतो?
➡️ सहकारी संस्थेची विश्वासार्हता आणि प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे.

4. या प्रकरणामुळे राजकीय वातावरण का तापले आहे?
➡️ सहकारी बँक हा संवेदनशील विषय असल्याने आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय तणाव वाढला आहे.

5. पुढे काय कारवाई अपेक्षित आहे?
➡️ कर्ज वाटप प्रक्रियेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT