Rajan Teli : 'राजन तेली टाकून दिलेलं..., विशाल परब मला फक्त भेटूच दे मग तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल'; नारायण राणेंनी दम भरला

Narayan Rane Politics : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीला तडा गेला आहे. येथे स्थानिकच्या तोंडावर दोन कट्ट्रर विरोधक एकत्र येण्याची शक्यता आहे.
Narayan Rane, Rajan Teli and Vishal Parab
Narayan Rane, Rajan Teli and Vishal Parabsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांदरम्यान राजन तेली यांच्या वक्तव्यामुळे नवा राजकीय वाद उफाळला आहे.

  2. भाजप खासदार नारायण राणेंनी स्पष्ट केलं की राजन तेली आणि विशाल परब यांचा भाजपशी काहीही संबंध नाही.

  3. या वक्तव्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली असून राजकीय वातावरण अधिक तापलं आहे.

Sindhudurg News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर राज्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी राजकीय वातावरण ढवळून सोडलं होतं. यामुळे महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. एकीकडे शिवसेना (उबाठा) आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता असनातानाच आता ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना तळकोकणात एकत्र येईल अशी राजकीय भविष्यवाणी शिंदेंच्या शिवसेनेचे नेते माजी आमदार राजन तेली यांनी करून आता नवा वाद सुरू केला आहे. तेली यांच्या या वक्तव्यामुळे आता तळकोकणात आणि कोकणात महायुतीलाच तडा गेल्याचे समोर आले आहे. ज्यामुळे भाजप खासदार नारायण राणे यांनी जोरदार टीका केली आहे.

तळकोकणात ठाकरे आणि शिंद सेना एकत्र येणार असल्याच्या चर्चा जोर धरत असून या चर्चांमुळे भाजपच्या स्वबळाच्या नाऱ्यालाच धक्का बसला आहे. भाजप नेते तथा मंत्री नितेश राणे स्वबळावरून मागे हटण्यास तयार नाहीत. तर त्यांचे बंधू तथा शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे देखील जिल्ह्यात भगवाच फडकेल असे ठासून सांगत आहेत.

यामुळे येथे महायुतीतील घटक पक्षांमध्ये वाद सुरू झाल्याचे चित्र आहे. अशातच आता भाजपला रोखण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून थेट ठाकरेंचा शिवसनेला हाक दिल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. याबाबत ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेंच्या शिवसेनेत गेलेले माजी आमदार राजन तेली यांनी सगळे एकत्र येणार असल्याचं म्हणत या चर्चेला दुजोरा दिला आह. ज्याच्यावरून आता वाद सुरू झाला असून भाजप खासदार नारायण राणे यांनी जोरदार टीका केली आहे.

Narayan Rane, Rajan Teli and Vishal Parab
Narayan Rane : भाजप-शिवसेना युतीत फूट? “शिंदेंसोबत संबंध तोडू”, राणेंचा इशारा; “आम्ही हतबल नाही” म्हणत शिंदेंच्या शिलेदाराचाही पलटवार

त्यांनी यावरून थेट शिंदेंच्या शिवसेनेशी दोन्ही जिल्ह्यात संबंध तोडू असा राजकीय कडक इशारा दिला आहे. तसेच मी राजन तेली याला कुठलाही नेता अथवा पदाधिकारी मानत नाही. राजन तेली आणि विशाल परब या दोन माणसांचा भाजपसोबत संबंध मानत नाही. त्यांच्या कोणत्याही म्हणण्याला माझा विरोध असेल. तर विशाल परब याने भाजपवर टीका केली असून तो फक्त भेटू दे. तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल. फक्त मतदारसंघ नाहीतर जिल्ह्यात युती झालीच व्हावी, असं नारायण राणे म्हणाले.

तसेच प्रतिष्ठित नागरिकांच्या व्याखेत राजन तेली बसत नाहीत, सर्वांनी त्यांना टाकून दिलेलं आहे. अशांना एकनाथ शिंदे का जमा करतोय? असाही निशाणा नारायण राणेंनी राजन तेली यांच्यावर शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशावरून साधला. तर विशाल परब मला भेटू दे मग तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल. मग त्याला वाचवायला कोणीही येऊ दे", अशी धमकीच नारायण राणेंनी दिलीय. तर जिल्ह्यात युती व्हावी, असं मी म्हणतोय. जागा वाटप उद्यापर्यंत ठरेल, असेही त्यांनी म्हटलं आहे.

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जवळपास युती करण्याचं ठरलेलं आहे. मला वाटतं युती व्हावी, दोन्ही जिल्ह्यामध्ये भाजपचा अध्यक्ष बसावा. युतीने 80 टक्के पेक्षा जास्त जागा युतीने घ्याव्यात. तसेच मी जोपर्यंत आहे तोपर्यंत राणे कुटूंबात अंतर्गद वाद होऊ देणार नाही. आमच्या राजकीय स्वार्थासाठी कोणताही वाद नाही, दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना बोलावलं होतं आणि त्यांचीही इच्छा आहे की युती व्हावी, असेही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

Narayan Rane, Rajan Teli and Vishal Parab
Narayan Rane News: वेळ बदलली..! नारायण राणेंना पाडणाऱ्या तडफदार महिला नेत्याचा आता राज ठाकरेंना धक्का; भाजपमध्ये पुन्हा 'एन्ट्री'

FAQs :

1. राजन तेली कोण आहेत?
राजन तेली हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते असून अलीकडे त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

2. नारायण राणेंनी काय वक्तव्य केलं?
राणेंनी स्पष्ट सांगितलं की राजन तेली आणि विशाल परब हे भाजपचे पदाधिकारी नाहीत आणि त्यांचा पक्षाशी काहीही संबंध नाही.

3. हा वाद कशामुळे निर्माण झाला?
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांदरम्यान राजन तेली यांच्या वक्तव्यामुळे वाद सुरू झाला.

4. यावर शिंदे सेनेची काय भूमिका आहे?
शिंदे सेनेत या वक्तव्यावरून नाराजी असून भाजपसोबतच्या संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

5. पुढे या प्रकरणाचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
या वादामुळे महायुतीत तणाव वाढू शकतो आणि स्थानिक निवडणुकीच्या समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com