Bhaskar Jadhav, Nilesh Rane  sarkarnama
कोकण

Nilesh Rane : सभा राणेंची बंदोबस्त भास्कर जाधवांच्या ऑफिसबाहेर

Bhaskar Jadhav Office Updates News : सभेमुळे कुठलाच अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता पोलिसांनी घेतली असून या ठिकाणचा बंदोबस्त वाढविण्यात आला होता.

Sachin Waghmare

Ratanagiri News : रत्नागिरीत शनिवारी शिवसेना शिंदे गटाचे आमदार नीलेश राणे यांची सभा होत आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर चिपळूण येथील आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यलयाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सभेमुळे कुठलाच अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता पोलिसांनी घेतली असून या ठिकाणचा बंदोबस्त वाढविण्यात आला होता.

चिपळूण येथील आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या कार्यालयात रविवारी प्रजाकसत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांची व शिवसैनिकांची मोठी रेलचेल असणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी कार्यकर्ते जमण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी आधीपासूनच याठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, सुमारे अकरा महिन्यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील कार्यालयासमोर निलेश राणे (Nilesh Rane ) यांचा ताफा आला. त्यावेळी ही दगडफेक झाली होती. निलेश राणे यांची गुहागरमध्ये सभेदिवशी चिपळूणमध्ये दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. या परिसरात प्रचंड तणाव आहे, त्यामुळे पोलिसांनी अश्रूधुराच्या कांड्या फोडून जमावाला हटवण्याचा प्रयत्न केला होता.

निलेश राणे यांची भास्कर जाधवांच्या गुहागर मतदारसंघात तळी येथे सभा आयोजित करण्यात आली होती. भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावेळी नारायण राणे पिता पुत्रांवर तुफान टीका केली होती. त्याला उत्तर म्हणून निलेश राणे यांनी गुहागरमध्ये या सभेचे आयोजन केले होते. या वेळी दोन्ही गटात मोठा राडा झाला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT