Shivsena Politics : कट्टर विरोधक एकत्र, शिवसेनेची ताकद वाढली; राजेश पाटलांनी धनुष्यबाण घेतला हाती

Rajesh Patil Joins Eknath shinde Shivsena : शिवसेनेकडून खासदार धैर्यशील माने आणि जिल्हा शिवसेना प्रमुख रवींद्र माने यांच्यावर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची कोल्हापूर जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.
Rajesh Patil Join Shivsena
Rajesh Patil Join Shivsenasarkarnama
Published on
Updated on

Shivsena Politics : हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजेश पाटील यांनी कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी राजेश पाटील यांच्या गळ्यात शिवसेनेचा भगवा स्कार्फ घालून त्यांचे स्वागत केले.

माजी सभापती राजेश पाटील यांच्या शिवसेनेतील प्रवेशाने रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघातील राजकारण बदलणार आहे. रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघात खासदार धैर्यशील माने यांचे कट्टर विरोधक म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेश पाटील हे होते. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून पक्षबांधणीला सुरुवात झाली आहे.

शिवसेनेकडून खासदार धैर्यशील माने आणि जिल्हा शिवसेना प्रमुख रवींद्र माने यांच्यावर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची कोल्हापूर जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.

Rajesh Patil Join Shivsena
Ambadas Danve On Walmik Karad : अंबादास दानवे म्हणतात, वाल्मीक कराडची किती संपत्ती ट्रान्सफर झाली याचा ईडीने तपास करावा!

कट्टर विरोधक एकत्र

रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघात 2017 च्या निवडणुकीत राजेश पाटील यांच्या पत्नी डॉ. पद्माराणी पाटील यांनी खासदार माने यांच्या पत्नीचा पराभव केला होता. मात्र, राजेश पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने गेली सात वर्षे कट्टर विरोधक असणारे एकत्र आले आहेत. रुकडी व हेरले दोन जिल्हा परिषद मतदारसंघ होतील असे समजते.त्यामुळे दोन्ही जिल्हा परिषद मतदारसंघावर खासदार माने यांचे वर्चस्व राहणार आहे.

शिवसेनेत पक्षप्रवेश

राजेश पाटील यांच्या पक्षप्रवेशावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना हातकणंगले तालुका सरचिटणीस मुनीर जमादार, श्री छत्रपती शिवाजी सोसायटीचे चेअरमन अशोक मुंडे , माजी उपसरपंच संदीप चौगुले, श्री छत्रपती शिवाजी महाराज सहकारी दूध संस्थेचे चेअरमन सुनील खोचगे यांनी देखील शिवसेना प्रवेश केले.

Rajesh Patil Join Shivsena
Vijay Wadettiwar : 'मतांवर दरोडा...'; विजय वडेट्टीवारांनी निवडणूक आयुक्तांवर डागली तोफ

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com