BJP News : भाजपची मोठी खेळी; शिंदे, अजितदादांना धक्का ? पालकमंत्री नसलेल्या 16 जिल्ह्यांची 'या' नेत्यांकडे जबाबदारी

Guardian ministers Maharashtra News : राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये भाजपकडून संपर्क प्रमुखांची नियुक्ती केली जाणार आहे. राज्य सरकारसोबत चांगला समन्वय राखण्याचं काम संपर्क प्रमुख करणार आहेत.
Mahayuti Government
Mahayuti Government Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून तीन पक्षात सर्व काही आलबेल असल्याचे दिसत नाही. या-ना त्या कारणावरून महायुतीमधील तीन पक्षात कुरबुरी पाहण्यास मिळत आहेत. सुरुवातीला मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना व भाजपमध्ये रस्सीखेच होती त्यानंतर गृहमंत्रीपदावरून संबंध ताणले गेले होते. त्यानंतर मंत्रिपदावरून चुरस होती तर काही खात्यावरून तीन पक्षांत मतभेद होते. त्यानंतर बंगले व पालकमंत्रीपदावरून वाद रंगला आहे.

Mahayuti Government
Shivsena UBT Politics : अमित शाहांवर टीका पण मोदींना साॅफ्ट काॅर्नर, उद्धव ठाकरेंची रणनीती ठरली!

या वादातूनच रायगड, नाशिकमधील पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे. या सर्व कारणावरून महायुतीत धुसफूस सुरु असतानाच आता भाजपने (BJP) नवा डाव टाकला आहे. भाजपनं मित्रपक्षांचे पालकमंत्री असलेल्या 16 जिल्ह्यांमध्ये भाजपकडून संपर्क प्रमुखांची नियुक्ती केली जाणार आहे.

Mahayuti Government
Uddhav Thackeray News : कोकणात भाजपचा ठाकरेंना दणका, नगरपंचायतीत पराभव; एका नगरसेवकानं केला गेम

दोन दिवसापूर्वी रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे एकीकडे महायुतीमधील भाजप, शिवसेना (Shivsena) शिंदे गट, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील मतभेद समोर आले आहेत. त्यातच आता भाजपने मित्रपक्षांचे पालकमंत्री असलेल्या 16 जिल्ह्यांसाठी नवी योजना आखली आहे आहे. 16 जिल्ह्यांमध्ये भाजपकडून संपर्क प्रमुखांची नियुक्ती केली जाणार आहे. राज्य सरकारसोबत चांगला समन्वय राखण्याचं काम संपर्क प्रमुख करणार आहेत.

Mahayuti Government
Sindhudurg Shiv Sena-BJP : राणेंकडून फोडाफोडी ?; शिवसेना-भाजपमध्ये शीतयुद्धाची सुरूवात?, चव्हाणही मैदानात उरतले

महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे पालकमंत्रीपद असलेल्या जिल्ह्यातील पालकमंत्री भाजपला वरचढ ठरत नाहीत ना, ते पाहण्याचे काम संपर्क प्रमुखांकडे असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमलेल्या पालकमंत्र्यांपैकी 20 भाजपचे आहेत. शिवसेनेचे 9 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 7 मंत्र्यांना पालकमंत्रिपद देण्यात आलेलं आहे. त्यामुळे भाजपकडून संपर्क प्रमुख नियुक्तीकरून मित्रपक्षांवर कुरघोडी करण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Mahayuti Government
NCP election strategy : राष्ट्रवादीचा कॉन्फिडन्स वाढला, थेट स्वबळाचा नारा!

भाजप मंत्र्यांच्या कारभारावर संघाचे असणार बारीक लक्ष

त्या सोबतच येत्या काळात भाजपच्या मंत्र्यांचे खासगी सहायक म्हणून त्यांच्या कार्यालयात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांची नेमणूक येत्या काळत होणार आहे. त्यामुळे भाजप मंत्र्यांच्या कारभारावर संघाचे बारीक लक्ष असणार आहे. 'निवडणूक काळात देण्यात आलेली आश्वासने पूर्ण करण्यात संपर्क प्रमुख महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. जनता आणि सरकार यांच्यातला दुवा म्हणून ते काम करतील, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

Mahayuti Government
Uddhva Thackeray News : उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com