रत्नागिरी : रत्नागिरी, दापोली येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) समर्थकांच्या मेळाव्यात शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, (Uddhav Thackeray) आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यावर टीका केली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे वरुन पाहून म्हणत असतील की, माझा मुलगा उद्धव हा शरद पवारांच्या आणि सोनिया गांधींच्या नादी लागून वाया गेला,असं वक्तव्य कदमांनी केलं होतं याला प्रत्युत्तर देतांना शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी कदमांवर हल्लाबोल केला होता. यावर आता रामदास कदमांनीही जाधव यांच्यावर पलटवार केला आहे. (Ramdas Kadam & Bhaskar Jadhav Latest News)
कदम यांनी घेतलेली सभा राजकीय वैचारिकतेला छेद देणारी असून त्यांनी वापरलेली भाषा ही आजपर्यंत कुणीही वापरली नव्हती, कदमांचे भाषण पाहिल्यानंतर महिला त्यांची जोड्याने पूजा करतील. मुंबईतील शौचालयात जेवढी घाण नाही, तेवढी घाण कदमांच्या तोंडून बाहेर पडली, अशा शब्दांत जाधव यांनी टीका केली होती.
आता जाधवांनी केलेली ही टीका कदमांच्या चांगलीच जिव्हारी लागल्याने त्यांनीही जाधवांवर पलटवार केला. ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंना खुश करण्यासाठीच जाधव यांनी माझ्यावर टीका करण्याचा उद्योग सुरू केला असून त्यांनी स्वतःची तपासणी लवकर करून घ्यावी, नाहीतर एक दिवस ते रस्त्यावर दगड मारत फिरताना दिसतील,अशी खोचक टीका कदमांनी केली आहे.
कदम पुढे म्हणाले की, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून दिशाभूल करण्याचे काम भास्कर जाधव करत आहे, असा आरोपही कदमांनी केला आहे.
दरम्यान, काल दापोली येथे शिंदे गटाच्या झालेल्या मेळाव्यात रामदास कदमांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरेंवर टीका केली होती. यावरून शिवसेना नेते आक्रमक झाले असून रामदास कदम यांच्यावर टीका करत आहे. कदमांच्या टीकेवरून राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनीही रामदास कदम यांच्यावर टीका केली होती. आता भास्कर जाधवांनी त्यांच्यावर टीका केल्याने कदमांनीही त्यांच्यावर पलटवार केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.