नरकात गेलेला माणूसही रामदास कदमांसारखं बोलणार नाही; राष्ट्रवादीच्या नेत्याने सुनावले...

Ramdas Kadam : शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
Ramdas Kadam & Sanjay Kadam
Ramdas Kadam & Sanjay KadamSarkarnama

रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेसोबत केलेल्या बंडानंतर शिंदे गटाचे नेते आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांमध्ये जोरदार शब्दिक युद्ध रंगत आहे. यामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्याकडून बंडखोरावर गद्दारी केल्याचा आणि ५० खोके घेतल्याचा आरोप केला जात असून शिंदे गटाच्या नेत्यांकडूनही शिवसेना आणि आघाडींच्या नेत्यावर आरोप करण्यात येत आहे.

दरम्यान शिंदे गटाच्या दापोलीतील मेळाव्यात शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे (NCP) माजी आमदार संजय कदम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (Ramdas Kadam & Sanjay Kadam Latest News)

Ramdas Kadam & Sanjay Kadam
संजय राऊतांना दिलासा नाहीच ; आर्थर रोड कारागृहातील मुक्काम वाढला

रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करतांना म्हणाले होते की, ते म्हणतात की मी बाळासाहेबांचा मुलगा आहे. मात्र असे ते किती वेळा सांगणार आहेत. काही संशय आहे का? आम्ही कधीही नाही म्हटलं आहे का? की ते बाळासाहेबांचा मुलगा नाही किंवा असे कुणी म्हणाल्याचंही ऐकलं का? तुम्हाला बाळासाहेबांचं नाव का सांगावं लागतंय? तुमचे काही कर्तृत्व आहे,अशा शब्दात रामदास कदमांनी कालच्या दापोलीतील मेळाव्यात ठाकरेंवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला दापोलीचे राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी उत्तर दिलं असून नरकात गेलेला माणूसही रामदास कदमांसारखं बोलणार नाही, अशा शब्दात त्यांनी रामदास कदमांना सुनावले.

Ramdas Kadam & Sanjay Kadam
खेड ग्रामपंचायत : तीन आमदारांना एकटे महेश शिंदे पडले भारी...

संजय कदम म्हणाले की, शिवसेनाप्रमुख यांच्यामुळे तुम्हाला आयुष्यभर आमदारकी,मंत्रीपद, विरोधीपक्ष नेतेपद मिळालं, तुमच्या मुलालाही आमदारकी मिळाली, त्या बाळासाहेबांच्या मुलाला म्हणजे उद्धवजी ठाकरे यांच्याबद्दल त्यांनी केलेले वक्तव्य हे नरकात गेलेला माणूस देखील करणार नाही. असे वक्तव्य केल्याने त्यांच्या तोंडात किडे पडतील,अशा कमेंट लोकांच्या येऊ लागल्या आहेत, त्यामुळे संपूर्ण कोकणी माणूस या रामदास कदमांचा निषेध करत आहे, अशा शब्दात त्यांनी रामदास कदमांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

Ramdas Kadam & Sanjay Kadam
शिंदे गटात गेलेल्या 'या' आमदार, मंत्र्यांना सत्ता काही मानवेना...

दरम्यान, रामदास कदमांनी काल्याच्या मेळाव्यात आदित्य ठाकरे, सेना आमदार भास्कर जाधव यांच्यावरही टीका केली आहे. यामुळे शिवसेनेकडून त्यांना कसे प्रत्युत्तर दिले जाते हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे. मात्र, सेनेच्या मदतीला आजघडीला राष्ट्रवादीचा नेता आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com