funeral cremation charge hike sarkarnama
कोकण

Funeral charge hike : कोकणात गोरगरिबांसाठी 'मरण महागले' : अंत्यसंस्कारासाठी नगरपरिषदेचे नवे दर जाहीर

Price hike on cremation in the cemetery : मृतदेहांच्या अंतिम संस्कारासाठी नगर परिषदेवर दरवर्षी लाखोंचा खर्च करावा लागत असल्यानेच दरवाढ करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Aslam Shanedivan

  1. रत्नागिरी पालिकेने स्मशानभूमीतील अंत्यसंस्कार शुल्क वाढवण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर केला.

  2. शहरातील मृतदेहासाठी लाकूड १५०० रुपये तर शहराबाहेरील मृतदेहासाठी २५०० रुपये दर निश्चित करण्यात आले.

  3. गॅस शवदाहिनीसाठी शहरातील मृतदेहासाठी १००० रुपये आणि बाहेरील मृतदेहासाठी २००० रुपये आकारले जाणार आहेत.

ratnagiri News : शहर आणि परिसरातील नागरिकांचे मरणेही आता महाग झाले आहे. रत्नागिरी पालिकेने स्मशानभूमींमधील अंत्यसंस्कारांवर दरवाढ करण्यास सर्वपक्षीय नगरसेवकांनी आजच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजुरी दिली. शहरासह आजूबाजूच्या गावांतील गरिबांना कमीतकमी ३ ते ४ हजार रुपये गाठीशी ठेवून जगाचा निरोप घ्यावा लागणार आहे. शहरातील मृतदेहाच्या अग्निसाठी लागणाऱ्या लाकडांना १५०० रुपये, शहराबाहेरच्या मृतदेहासाठी २५०० रुपये मोजावे लागणार आहेत. गॅस शवदाहिनीसाठी शहरातील मृतदेहाच्या अंतिम संस्कारासाठी १००० रुपये, तर शहराबाहेरच्या मृतदेहासाठी २००० रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत.

पालिकेची सर्वसाधारण सभा आज नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. पालिकेची आर्थिक स्थिती सावरण्यासाठी यापूर्वीच्या अर्थसंकल्पीय विशेष सभेत अग्निशमन आणि दिवाबत्ती करवाढीचे ठराव मंजूर झाले. एकत्रित मालमत्ता कराच्या २ टक्के अधिक कर आता पुढच्या आर्थिक वर्षापासून वाढणार आहेत.

यातील अग्निशमन कर लावू नये, अशी लेखी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या तीन नगरसेवकांनी केली. दिवाबत्ती कराला मात्र शिवसेना-भाजप युतीसह शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांनीही मंजुरी दिली आहे. स्वच्छता सेवाकराचा विषय मात्र स्थगित ठेवण्यात आला आहे.

मृतदेहांवरील अंत्यसंस्कारांबाबत कार्यालयीन टिप्‍पणी वाचण्यात आली. तेव्हा मृतदेह अंतिम संस्कारासाठी सुमारे ३५ लाख रुपये खर्च होतो, असे सभा अधीक्षक जितेंद्र विचारे यांनी सभागृहाला सांगितले. त्यानंतर सुधारित वाढीव दर वाचण्यात आले.

स्मशानभूमीतील लाकडांसाठी शहरासाठी पूर्वी १ हजार रुपये आणि शहराबाहेरील मृतदेहासाठी २ हजार रुपये आकारले जात होते. त्याचबरोबर गॅसचे व दाहिनीचे शहरातील मृतदेहासाठी ५०० रुपये, तर शहराबाहेरील मृतदेहासाठी १ हजार रुपये आकारले जात होते. आता हे दर स्मशानभूमीतील मृतदेहाच्या अंतिम संस्कारासाठी शहरातील मृतदेहाच्या विधीसाठी १ हजार ५०० रुपये तर शहराबाहेरील मृतदेहाच्या विधीसाठी २ हजार ५०० रुपये निश्चित करण्यात आले.

असा वाढतोय खर्च...

शहरातील मृतदेह अंतिम संस्कारासाठी स्मशानभूमीत वाहनाने नेण्यासाठी भाडे लागते. त्याचबरोबर इतर धार्मिक विधीसाठी खर्च होत असतो. त्यात आता अंतिम संस्काराच्या वाढीव दरांची भर पडली आहे. त्यामुळे महागाईशी झगडत जीवन जगणाऱ्यांना मृत्यूही महाग झाला आहे.

FAQs :

1. दरवाढीचा निर्णय कोणी घेतला?
रत्नागिरी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकमताने मंजुरी दिली.

2. लाकूड वापरून अंत्यसंस्कारासाठी किती शुल्क आकारले जाणार आहे?
शहरातील मृतदेहासाठी १५०० रुपये आणि बाहेरील मृतदेहासाठी २५०० रुपये.

3. गॅस शवदाहिनीचे दर काय आहेत?
शहरातील मृतदेहासाठी १००० रुपये, बाहेरील मृतदेहासाठी २००० रुपये.

4. या निर्णयाचा परिणाम कोणावर होणार आहे?
शहर आणि परिसरातील नागरिकांना अंतिम संस्कारासाठी अधिक खर्च करावा लागणार आहे.

5. दरवाढ कधीपासून लागू होणार आहे?
पालिकेच्या अधिकृत अधिसूचनेनंतर नवे दर लागू होतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT