Ratnagiri Police : आरोपीला ‘हॉटेल ट्रीट’ देणं पोलिसांना भोवलं, पारदर्शकता आणि निष्पक्षतेवर प्रश्न निर्माण होताच SP नीं घेतला मोठा निर्णय

Ratnagiri TWJ Scam : टीडब्लूजे आर्थिक फसवणूक प्रकरणाने कोकणातील अनेकांचे धाबे दणाणले होते. या प्रकरणात फरार आरोपीला अटक झाली असून आता पोलिसच अडचणीत आले आहेत.
Ratnagiri Police
Ratnagiri Policesarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. टीडब्ल्यूजे कंपनीने ११ हजार गुंतवणूकदारांची सुमारे १२०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

  2. फरार आरोपी संकेश घाग अटकेत आल्यानंतर प्रकरणात व्हीआयपींचा सहभाग असल्याची चर्चा वाढली आहे.

  3. आरोपीला हॉटेलमध्ये नेऊन पाहुणचार दिल्याच्या आरोपामुळे रत्नागिरी पोलिसांवर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.

Ratnagiri News : टीडब्ल्यूजे कंपनीने राज्यभरातील तब्बल 11 हजार गुंतवणूकदारांची सुमारे 1 हजार 200 कोटींची फसवणूक केल्याने अनेकांना आर्थिक फटका बसला होता. या प्रकरणात राज्यातील अनेक राजकीय नेते, अधिकारी, उद्योजक अशा व्हीआयपींचा समावेश असल्याचे ठाणे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासातून समोर आले होते. तर टीडब्लूजे आर्थिक फसवणूक प्रकरणातील फरार आरोपी संकेश घागला अटक झाल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले होते. पण आता या प्रकरणात गुंतलेले हात आणि आरोपी संकेश घागला वेगळे राहिले असून पोलिसच अडचणीत आले आहेत. घागला हॉटेलमध्ये नेऊन राजेशाही पाहुणचार घडवणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याचे संकेत जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिले आहेत. यामुळे आता रत्नागिरी पोलिसांत खळबळ उडाली आहे.

नार्वेकर दाम्पत्य व त्यांच्या साथीदारांनी टीडब्ल्यूजे असोसिएट्स प्रायव्हेट लिमिटेडसह पंधराहून अधिक कंपन्या स्थापन केल्या होत्या. या कंपन्यांमध्ये गुंतवणुकीवर उच्च परतावा देण्याचे आमिष दाखवून तसेच सरकारी प्रकल्पांसाठी मोठे कंत्राट मिळवण्याचा दावा करून राज्यभरातील अनेक व्हीआयपी लोकांना तब्बल 11 हजार गुंतवणूकदारांना 1 हजार 200 कोटी रुपयांचा गंडा घातला.

करोडो रुपयांची माया जमवून कंपनीने गाशा गुंडाळला होता. ज्यानंतर कोकणासह राज्यभरात खळबळ उडाली होती. तर कंपनीचा मालक आणि व्यवस्थापकीय संचालक समीर नार्वेकर, त्याची पत्नी नेहा नार्वेकर यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर ठाणे, चिपळून, पुणे, यवतमाळसह विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर गुन्हा दाखल झाल्यापासून नार्वेकर दाम्पत्य व त्यांचे साथीदार फरार झाले होते.

दरम्यान या प्रकरणात फरार नार्वेकर आणि त्याची पत्नी नेहा नार्वेकर आणि अमीत विश्वनाथ बालम या तिघांना ठाणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुजरातमधून अटक करण्यात आली होती. तर २७ जानेवारी रोजी त्याला चिपळूण सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते, जिथे न्यायालयाने त्याला ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. यावेळी आरोपी संकेश घागला पोलिसांनी चक्क हॉटेलमध्ये नेऊन शाही पाहुणचार केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने संतापाची लाट उसळली. तर रत्नागिरी पोलीस दलात मोठी खळबळ उडाली होती.

Ratnagiri Police
ratnagiri political clash : सामंतांना आव्हान देणाऱ्या उमेदवाराचा पराभव, विजयानंतर कार्यकर्त्यांचा उन्माद, हातखंब्यात राडा! घरासमोर मिरवणूक, नारळ अन् फटाके फोडले

हजारो गुंतवणूकदारांना आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त करणाऱ्या आरोपीला न्यायालयात हजर करण्यापूर्वी पोलिसांनी हॉटेलमध्ये नेऊन जेवण दिल्याने वाद सुरू झाला. तसेच पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. तर हजारो कोटींच्या घोटाळ्यातील आरोपीला ‘व्हीआयपी’ सुविधा का? असा सवाल संतप्त गुंतवणूकदारांकडून विचारला जात आहे.

यानंतर या प्रकरणाची दखल जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी घेतली असून कारवाईचे संकेत दिले आहेत. त्यांनी आरोपी संकेश घागला शाही पाहुणचार करणाऱ्या संबंधित पोलिसांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. तसेच दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले आहे.

Ratnagiri Police
Ratnagiri Politics : धक्कादायक! निकाल लागताच कोकणात बड्या नेत्याने ठाकरेंची साथ सोडली, राजीनाम्याने शिवसैनिकांमध्ये खळबळ

FAQs :

1. टीडब्ल्यूजे घोटाळ्यात किती रकमेची फसवणूक झाली आहे?
या प्रकरणात सुमारे १२०० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे.

2. किती गुंतवणूकदार प्रभावित झाले आहेत?
राज्यातील सुमारे ११ हजार गुंतवणूकदारांना आर्थिक फटका बसला आहे.

3. संकेश घाग कोण आहे?
तो या आर्थिक फसवणूक प्रकरणातील फरार आरोपी असून त्याला अटक करण्यात आली आहे.

4. पोलिसांवर कारवाई का होणार आहे?
आरोपीला हॉटेलमध्ये नेऊन राजेशाही पाहुणचार दिल्याच्या आरोपांमुळे पोलिसांवर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.

5. या प्रकरणाचा तपास कोण करत आहे?
ठाणे आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com