रत्नागिरी जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी आज निवडणूक होत आहे.
शिवसेना प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत.
रत्नागिरी, राजापूर, लांजा, खेड आणि गुहागर या तालुक्यांमध्ये शिवसेनेचे वर्चस्व कायम असल्याचे दिसत आहे.
ratnagiri news : जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी आज, दि. ९ मार्च रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी संबंधित प्रशासनाकडून आवश्यक तयारी झाली असून निवडणूक प्रक्रिया नियोजित वेळापत्रकानुसार पार पडणार आहे. या निवर्डीमुळे सध्या जिल्ह्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बहुतांश तालुक्यांमधील निवडीचे चित्र स्पष्ट झाले असून या प्रक्रियेत शिवसेनेने आपले वर्चस्व कायम राखत रत्नागिरी, राजापूर, लांजा, खेड आणि गुहागर यांसारख्या महत्त्वाच्या तालुक्यांत मजबूत पकड ठेवली आहे.
दरम्यान लोकसत्ता दैनिकाच्या (वेब) वृत्तानुसार शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यातील पंचायत समितींच्या सभापती व उपसभापती पदांसाठी नावे जाहीर करण्यात आली आहेत. पक्ष आदेशानुसार सभापती व उपसभापती ही पदे सव्वा वर्षांच्या कालावधीसाठी राहणार आहेत. सभापती-उपसभापती निवडीआधीच झालेल्या या घोषणेमुळे येथील राजकीय वातावरण तापल्याचे दिसत आहे.
शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि जिल्ह्याचे नेते सामंत यांच्या सुचनेनुसार प्रथमच निवडून आलेल्या सदस्यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर सव्वा वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं तालुकानिहाय संभाव्य पदाधिकारी जाहीर केले आहेत...
मंडणगड पंचायत समिती
सभापती – प्रणाली संदेश चिले
उपसभापती – दिपक शंकर मालुसरे
खेड पंचायत समिती
सभापती – आफिया नजीब पालेकर
उपसभापती – सुनिल बाबाराम मोरे
दापोली पंचायत समिती
सभापती – उन्मेष रामचंद्र राजे
उपसभापती – नम्रता प्रदीप तोडणकर
चिपळूण पंचायत समिती
सभापती – संदेश मनोहर आयरे
गुहागर पंचायत समिती
सभापती – प्रणव प्रमोद पोळेकर
देवरुख पंचायत समिती
सभापती – शर्वरी प्रथमेश वेल्ये
रत्नागिरी पंचायत समिती
सभापती – प्रविण धोंडू पांचाळ
उपसभापती – गजानन धर्माजी धनावडे
राजापूर पंचायत समिती
सभापती – नंदिनी नितिन कदम
उपसभापती – अभिजित यशवंत गुरव
लांजा पंचायत समिती
सभापती – मानसी सिद्धेश्वर आंबेकर
उपसभापती – आदेश दत्तात्रय आंबोळकर
FAQs :
1. रत्नागिरी जिल्ह्यात कोणती निवडणूक होत आहे?
पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक होत आहे.
2. या निवडणुकीत कोणत्या पक्षाचे वर्चस्व दिसत आहे?
शिवसेनेचे वर्चस्व अनेक तालुक्यांमध्ये दिसत आहे.
3. उमेदवारांची नावे कोणी जाहीर केली?
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली नावे जाहीर झाली.
4. कोणकोणत्या तालुक्यांत शिवसेनेची पकड मजबूत आहे?
रत्नागिरी, राजापूर, लांजा, खेड आणि गुहागर या तालुक्यांत शिवसेनेची मजबूत पकड आहे.
5. सभापती आणि उपसभापती पदांचा कार्यकाळ किती आहे?
पक्ष आदेशानुसार या पदांचा कार्यकाळ सव्वा वर्षांचा असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.