Uday Samant News : सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघातील उमेदवारी अजून निश्चित झालेली नाही. या मतदारसंघावर भाजपने दावा सांगितले आहे. नारायण राणे येथून उमेदवार असतील. त्यांनी प्रचाराला सुरुवातदेखील केली आहे. मात्र, शिवसेना (शिंदे गट) सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघावरील दावा सोडण्यास तयार नाही. शिवसेनेचे संभाव्य उमेदवार किरण सामंत यांनी मतदारसंघावरील दावा सोडल्याची सोशल मीडियावर केलेली पोस्टदेखील डिलीट केली आहे. त्यामागे रात्री उदय सामंत - नारायणे यांची भेट कारणीभूत असल्याची चर्चा आहे.
मंगळवारी रात्री किरण सामंत (Kiran Samant) यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मतदारसंघावरील दावा सोडल्याचे जाहीर केले. मात्र, सकाळ उजडेपर्यंत किरण सामंत यांनी सोशल मीडियावरील पोस्ट डिलीट केली. जेव्हा किरण सामंत यांनी पोस्ट केली, त्यावेळी नारायण राणे (Narayan Rane) आणि उदय सामंत यांची भेट झाल्याची चर्चा आहे. या भेटीनंतर दुसऱ्या दिवशी उदय सामंत यांनी शिवसेनेचा या मतदारसंघावरील दावा कायम असल्याचे जाहीर केले. मात्र, राणे-सामंतांच्या भेटीत काय चर्चा झाली हे समोर आले नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
किरण सामंत यांनी मुख्यमंत्र्यांना त्रास नको म्हणून ती पोस्ट भावनेच्या भरात केल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. कार्यकर्ते आणि आपण त्यांची समजूत घातल्याने ती पोस्ट त्यांनी डिलीट केली, असेदेखील सामंत यांनी जाहीर केले. भावनिक व्यक्तीच मतदारसंघाचा विकास करेल, असे म्हणत मतदारसंघावर शिवसेनेचा दावा कायम असल्याचेदेखील उदय सामंत यांनी ठणकावून सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमध्ये आज (बुधवारी) शिवसेना आणि भाजपची समन्वय समितीची बैठक कुडाळ येथे होणार होती. मात्र, या बैठकीला उदय सामंत हे उपस्थित राहिली नाही. त्यांनी नारायण राणे यांच्यासोबत बंद खोलीत काही वेळ चर्चा केली आणि ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले . त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा अजून कायम आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.