Narayan Rane Vs Uddhav Thackeray: 'अबकी बार भाजप तडीपार' म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंवर नारायण राणेंचा पलटवार, म्हणाले...

Narayan Rane Press Conference News : बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांचे रुद्राक्ष फेकले, असं खळबळजनक विधानही राणेंनी केलं आहे.
Uddhav Thackeray Vs Narayan Rane
Uddhav Thackeray Vs Narayan RaneSarkarnama

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गल्ली ते दिल्लीपर्यंत राजकीय वातावरण तापलेलं आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी अबकी बार भाजप तडीपार असा नारा देत, भाजपला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तडीपार करा, असे जनतेला आवाहन केले आहे. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकारपरिषदेत बोलताना जोरदार प्रत्युत्तर दिलं.

नारायण राणे(Narayan Rane) म्हणाले, 'आमचे देशभरात 303 खासदार आहेत. देशात आणि राज्यात सत्ता आहे तडीपारच करायचं म्हटलं तर आम्ही कुणालाही करू. कोरोनामध्ये औषधाचे पैसे खाणाऱ्यांना करू. ज्यांच्यावर अनेक आरोप आहेत, त्यांना उद्धव ठाकरेंना करू. उद्धव ठाकरेंची मानसिक स्थिती बिघडली आहे.

पंतप्रधानांवर टीका करण्या एवढची त्यांची लायकी नाही. केवळ भारतातच नाही, संपूर्ण जगात भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. त्यांनी जरा माहिती घ्यावी केवळ सामना वाचू नये. केवळ बंडलबाज संपादकाने लिहिलेले लेख न वाचता, अन्यही वाचन करावे.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uddhav Thackeray Vs Narayan Rane
Lok Sabha Election 2024 : शिवसेनेचे दोन उमेदवार बदलण्यासाठी भाजपचा मुख्यमंत्र्यांवर दबाव; शिंदे शब्द पाळणार की उमेदवार बदलणार?

याचबरोबर 'मी 39 वर्षे शिवसैनिक होतो. आम्हाला पदं मिळाल्यानंतर आम्ही जेव्हा मातोश्रीवर जायचो तेव्हा कधीच रिकाम्या हाती जायचो नाही. प्रसाद तर घेऊन जावाच लागायचा. तुम्ही जे मागत होता तो काय काळा पैसा नव्हता. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा काय व्यवसाय आहे?' असा सवालही राणेंनी केला आहे.

याशिवाय 'पाच वर्षे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी(Devendra Fadnavis) तुम्हाला सांभाळलं. अशी परतफेड करू नका. मला माहीत आहे कसं आणि कुठे कुठे सांभाळलं आहे. मी उद्धव ठाकरेंना चांगलं ओळखतो. बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर, ते हातात घालत असलेली रुद्राक्षाची माळ घरात ठेवलेली होती, मात्र उद्धव ठाकरेंनी ती फेकून दिली. अशा शब्दांमध्ये नारायण राणे यांनी पलटवार केला.'

Uddhav Thackeray Vs Narayan Rane
Lok Sabha Election 2024 : एकनाथ शिंदे लोकसभेचा एक उमेदवार बदलणार; तो उमेदवार मराठवाडा की पश्चिम महाराष्ट्रातील?

'शिवसेना उभारी घेत असताना, उद्धव ठाकरेंनी(Uddhav Thackeray) एवढ्या वर्षांत कुठे जरी दंगल झाली. तर शिवसैनिकांना मदत. विरोधक अंगावर आले तर कधी कुणाच्या कानफाडात मारल्याचं कोणी ऐकलं आहे का? पण स्टेजवर चढलं की याचा बंदोबस्त करू, त्याचा करू अशी भाषा वापरतात. या निवडणुकीत त्यांचे केवळ पाचच खासदार येणार. लोकसभा निवडणुकीनंतर तर संजय राऊतही राहणार नाहीत.' असंही राणेंनी यावेळी सांगितलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com