Uddhav Thackeray Sarkarnama
कोकण

Konkan Politic's : मातोश्रीवर 40 वर्षांपासून निष्ठा वाहिलेल्या कोकणातील बड्या नेत्याने सोडली ठाकरेंची साथ

Ratnagiri's Former District chief Resign Shivsena : भास्कर जाधव यांच्यासोबत असलेल्या संघर्षामुळेच सचिन कदम यांना शिवसेना आणि ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतलेला असावा, असा कयास कोकणातील राजकीय वर्तुळातून बांधला जात आहे.

Vijaykumar Dudhale

Ratnagiri, 24 January : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला कोकणात पुन्हा एकदा खिंडार पडले आहे. रत्नागिरीतील ठाकरे गटातील सुमारे चारशे पदाधिकाऱ्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यापाठोपाठ गेली 40 वर्षांपासून ठाकरेंशी एकनिष्ठ असणारे रत्नागिरीचे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनीही आज (ता. 24) ठाकरेंची साथ सोडली आहे. त्यामुळे कोकणात ठाकरेंना दुहेरी धक्का बसला आहे.

सचिन कदम (Sachin Kadam) यांनी रत्नागिरी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा पक्षाकडे सोपवला आहे. ते गेली चाळीस वर्षांपासून ठाकरे यांच्यासोबत काम करत होते. अगदी शिवसेनेत फूट पडल्यानंतरही सचिन कदम यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबतच राहणे पसंत केले होते. मात्र, कदम यांचा शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्यासोबत मात्र संषर्घश होता. त्यात संघर्षातूनच सचिन कदम यांनी ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.

सचिन कदम यांची शिवसेनेचे माजी मंत्री अनंत गीते आणि माजी खासदार विनायक राऊत यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख होती. गीते आणि राऊत यांच्याशी सचिन कदम यांच्या सलोख्याचे संबंध असले तरी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्याशी त्यांचे पटत नव्हते. सचिन कदम यांच्या राजीनाम्यामुळे रत्नागिरीत काम एकच खळबळ उडाली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सचिन कदम प्रवेश करणार असल्याची चर्चा कोकणात रंगली आहे. मात्र, खुद्द सचिन कदम यांनी त्याचा इन्कार केला आहे. मी माझ्या वैयक्तिक कारणांमुळे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदाचा आणि पक्ष सदस्यत्त्वाचा राजीनामा दिलेला आहे. आपण सध्या कोणत्याही पक्षात जाणार नाही, असं स्पष्टीकरण सचिन कदम यांनी दिले आहे.

दरम्यान, भास्कर जाधव यांच्यासोबत असलेल्या संघर्षामुळेच सचिन कदम यांना शिवसेना आणि ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतलेला असावा, असा कयास कोकणातील राजकीय वर्तुळातून बांधला जात आहे. त्यामुळे सचिन कदम यांनी शिंदे गटासोबत ठाकरेंची साथ सोडली की जाधव यांच्याशी पटत नसल्याने शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला, हे याची मात्र उत्सुकता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT