Sharad Pawar on Thackeray : उद्धव ठाकरेंचे स्वबळाबाबत सूतोवाच अन्‌ शरद पवारांची गुगली

Local Body Election Issue : उद्धव ठाकरे हे दोन दिवसांपूर्वी माझ्याकडे आले होते. आमच्यामध्ये सविस्तर चर्चाही झाली. ठाकरेंनी काल आपल्या भाषणातूनही स्वबळावर निवडणुका लढविण्याबाबत जे काही भाष्य केले आहे, तसं त्यांचं मत आहे.
Sharad Pawar-Uddhav Thackeray
Sharad Pawar-Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 24 January : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढविण्याबाबत सूतोवाच केले आहे. तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमातही स्वबळाबाबत भाष्य केले आहे, त्यामुळे शिवसेना आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढवणार का महाविकास आघाडी एकत्र राहून लढणार, याची चर्चा रंगलेली असतानाच आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ठाकरेंच्या त्या भूमिकेबाबत मोठे भाष्य केले आहे. त्या भाष्यामुळे ठाकरेंच्या स्वबळाच्या भूमिकेबाबत पुन्हा संदिग्धता निर्माण झाली आहे.

शरद पवार (Sharad Pawar) यांनी उद्धव ठाकरे यांच्या स्वबळाच्या भूमिकेबाबत आपले मत मांडले आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे हे दोन दिवसांपूर्वी माझ्याकडे आले होते. आमच्यामध्ये सविस्तर चर्चाही झाली. उद्धव ठाकरेंनी काल आपल्या भाषणातूनही स्वबळावर निवडणुका लढविण्याबाबत जे काही भाष्य केले आहे, तसं त्यांचं मत आहे. पण, त्यासाठी एकदम टोकाची भूमिका त्यांच्याकडून घेतील जाईल, असे मला वाटत नाही.

शिवसेनेने महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवावी, अशी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची इच्छा आहे. मात्र, हा प्रश्न सामंजस्याने सुटावा, असे आमच्या लोकांना वाटतंय, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले, त्यामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक, संभाजी नगर पालिकेच्या निवडणुका खरंच स्वबळावर लढवणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Sharad Pawar-Uddhav Thackeray
Amit Shah Malegaon Tour : छगन भुजबळांच्या अमित शाह प्रेमाने उंचावल्या अनेकांच्या भुवया!

मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मातोश्रीवर शिवसेनेची एक बैठक झाली होती, त्या बैठकीत महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवावा, असा सूर उमटला होता. त्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी आम्ही मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे या महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याचा विचार करतोय, असे म्हटले होते.

Sharad Pawar-Uddhav Thackeray
Jaykumar Gore Solapur Tour : पालकमंत्री गोरेंच्या दौऱ्यात मोहिते पाटील विरोधकांना मानाचे पान; निंबाळकर, सातपुते, राऊतांना मिळणार बळ!

दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना उद्देशून तुमच्या मनात असेल तर मीही स्वबळावर निवडणुका लढविण्यास तयार आहे, असे विधान केले होते. त्यानंतर शिवसेना स्वबळावर महापालिका निवडणुका लढविणार, परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, शरद पवार यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून ठाकरेंच्या स्वबळाबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com