Vinayak Raut, Chandrakant Patil Sarkarnama
कोकण

Chandrakant Patil News: राऊतांनी चंद्रकांतदादांना करून दिली 'ती' आठवण; म्हणाले "बाबरीनंतर..."

सरकारनामा ब्युरो

Maharashtra Politics : राज्यात सध्या भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि ठाकरे गटामध्ये आरोप आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू आहे. असे असतानाच आता भाजप नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशीद पाडण्यात शिवसेनेचा काहीही संबंध नव्हता, असा दावा केला आहे.

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, "बाबरी मस्जिद पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा सहभाग नव्हता. बाबरी मस्जिद पाडल्यानंतर बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, बाबरी मस्जिद पाडली याची जबाबदारी मी घेतो. पण त्यावेळी अयोध्येत शिवसेना गेली होती का? की बाळासाहेब ठाकरे हे तेथे गेले होते? बाबरी मस्जिद पाडली त्यावेळी शिवसेना तिथे गेली होती की बजरंग दल? कारसेवक हे बजरंग दलाच्या नेतृत्वाखाली गेले होते."

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याच्या ठाकरे गटाकडून चांगलाच समाचार घेतला जात आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, बाबरीच्या खंदकातून आता उंदीर बाहेर पडू लागले आहेत. बाबरी पाडली तेव्हा हे उंदीर कोणत्या बिळात लपून बसले होते. ते इतके वर्ष गप्प का बसले होते?" आता खासदार विनायक राऊतांनीही पाटील यांना सत्तेचा माज आल्याची टीका केली आहे.

खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) म्हणाले, चंद्रकांत पाटील यांना सत्तेचा माज आलेला आहे. सत्तेची मिजास आलेली आहे. सत्तेच्या गुर्मीतच चंद्रकांतदादा यांच्यासारखे भाजपचे नेते बोलत आहेत. बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यानंतर लोकसभेत रडणारे भाजपचे नेते जगाने पाहिलेले आहेत. बाबरी उद्ध्वस्त करणाऱ्यांना आधार देणार बाळासाहेबही जगाने पाहिले आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या नेत्यांना काय उत्तर द्यायचे? लोकच त्यांना उत्तर देतील. यातून त्यांची बुद्धी दारिद्र्य पाहून लोक हसत आहेत."

नारायण राणे (Narayan Rane) यांनी ठाकरेंची शिवसेना आता चिवसेना झाली आहे. त्यावर विनायक राऊतांनी त्यांचा समाचार घेतला. राऊत म्हणाले, भाजपने पाळलेले सर्वजण आता भुंकायला लागले आहेत. सर्वांना माहितच आहे की भुंकणारे चावत नाहीत." दरम्यान, राणे यांनी राऊतांनाही फडफडणारा कंदील कधीही विझू शकतो अशी टीका केली होती. त्याला उत्तर देताना राऊत म्हणाले की, राणेंनी आता त्यांचा फडफडायला लागलेला कंदीलाकडे पहावे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT