Satyajeet Tambe News : नाशिकला मराठी भाषा अभ्यास केंद्र उभारणार!

कविवर्य कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या निवासस्थानावर एक मजला चढवणार
MLC Satyajeet Tambe
MLC Satyajeet TambeSarkarnama
Published on
Updated on

Nashik Marathi language centre news : आमदार सत्यजीत तांबे यांनी नुकतेच मराठी भाषा अभ्यास केंद्र उभारण्यासाठी आमदार निधीतून पन्नास लाख रुपये निधी देण्याची घोषणा केली आहे. या निधीतून कविवर्य कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या निवासस्थानावर एक मजला चढवून तिथे मराठी भाषा अभ्यास केंद्र उभारले जाणार आहे. (One floor will construct at Kusumagraj Residence)

आमदार सत्यजीत तांबे (MLC Satyajeet Tambe) यांच्या निधीतून (Funds) होणाऱ्या या बांधकामामुळे गेल्या पंचवीस वर्षांपासून जतन करून ठेवलेले कुसुमाग्रजांचे निवासस्थान, वाचनालय व त्यांच्या वस्तू (Nashik) यांना धक्का लागणार नाही याची व्यवस्था कशी करणार हा प्रश्न पुढे येऊ शकतो. महापालिकेने (NMC) महापौर निधीतून हा प्रयत्न केला होता. मात्र तो प्रयत्न हाणून पाडण्यात आला होता.

MLC Satyajeet Tambe
Eknath Shinde News : अयोध्येतून परतताच शिंदे यांची निवडणुकी तयारी सुरू!

शहरात गंगापूर रोडवर कुसुमाग्रज स्मारक आहे. कुसुमाग्रजांच्या निवासस्थानाच्या रचनेत बदल करण्यापेक्षा त्या स्मारकातच हे अभ्यासकेंद्र का उभारले जात नाही, असा प्रश्‍न यानिमित्ताने विचारला जात आहे.

क्रांतीचे गीत गाणारे कुसुमाग्रज यांच जन्मदिन मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी साहित्यिकांसाठी कुसुमाग्रजांचे निवासस्थान एक तीर्थक्षेत्र आहे. कुसुमाग्रजांच्या निवासस्थानातील एका खोलीत त्यांच्या सर्व वस्तू ते हयात असतानाच्या स्वरूपात राखण्यात मूळ स्वरूपात असावी, अशीच राज्यातील कुसुमाग्रजप्रेमी आणि सर्वसामान्य नाशिककरांची अपेक्षा होती.

MLC Satyajeet Tambe
Devidas Pingle News : सुनावणी रद्द झाल्याने देविदास पिंगळे यांना दिलासा!

कुसुमाग्रजांचे निवासस्थान मूळ स्वरुपात जतन व्हावे, ही त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या मंडळींची इच्छा आहे. पण निवासस्थानाची जागा महापालिकेची असल्यामुळे महापालिकेतील सत्तेत वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या काही मंडळींच्या डोळ्यात ती जागा खूपत असल्याचे दिसत आहे.

दहा वर्षापूर्वी महापौर निधीतून ३१ लाख रुपये देऊन कुसुमाग्रजांच्या निवासस्थानातील वाचनालयावर एक मजला चढवून त्या निवासस्थानाचे विस्तारीकरण करण्याचा प्रयत्न झाला होता. तसेच त्या कामाचा प्रस्तावित आराखडाही तयार करण्यात आला होता. त्यावेळी कुसुमाग्रजांवर प्रेम करणाऱ्या लोकांनी त्याला विरोध केल्याचे तो प्रस्ताव मागे घेण्यात आला.

आता दहा वर्षांनी पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांनी आमदार निधीतून पन्नास लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. या निधीतून भराठी भाषा अभ्यास केंद्र उभारले जाणार आहे. या अभ्यासकेंद्रासाठी कुसुमाग्रजांच्या निवासस्थानात बदल करून एक मजला बांधकाम केले जाणार आहे.

MLC Satyajeet Tambe
CM Eknath Shinde News : शेतकरीराजाला नैसर्गिक संकटापासून वाचव

युरोपमधील महान साहित्यिकांचे निवासस्थान, त्यांच्या वापरातील वस्तू यांचे शेकडो वर्षांपासून जतन करण्यात आले आहे. यामुळे जगभरातून जाणाऱ्या पर्यटकांना ते आवर्जून दाखवले जाते. कुसुमाग्रजांनीही युरोपीयनांच्या या परंपरेचे त्यांच्या लेखनातून कौतुक केले आहे. त्यांच्या याच भावनेचा आदर करीत कुसुमाग्रजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वस्तूंचे व निवासस्थानाचे जतन करण्यात आले आहे. मात्र, या मराठी भाषा अभ्यास केंद्राच्या निमित्ताने होणाऱ्या बांधकामामुळे या निवासस्थानाचे विद्रुपीकरण होऊ नये याची दक्षता घ्यावी लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com