Maharashtra Politics: बाबरी पडली अन्‌ बाळासाहेबांना फोन आला: उद्धव ठाकरेंनी चंद्रकांतदादांना सुनावताना संपूर्ण इतिहासच सांगितला..

'बाबरी मशीद पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा सहभाग नव्हता. असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होते.
Uddhav Thackeray | Chandrakant Patil :
Uddhav Thackeray | Chandrakant Patil :Sarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray News : 'पंतप्रधान मोदींचा बांग्लादेशच्या लढाईत सहभाग, पण बाबरीच्या वेळी हिमालयात..'; ठाकरेंचा सणसणीत टोलाUddhav Thackeray Replied To Chandrakant Patil : बाबरीच्या खंदकातून आता उंदिर बाहेर पडू लागले आहेत. पण जेव्हा बाबरी पाडली तेव्हा हे उंदिर कोणत्या बिळात लपून बसले होते. ते इतके वर्ष गप्प् का बसले होते. असा सवाल करत सांगत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याला उत्तर दिलं आहे. (Uddhav Thackeray Replied To Chandrakant Patil)

'बाबरी मशीद पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा (Shivsena) सहभाग नव्हता.  असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होते. त्याला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे. ''बाबरी पाडल्यानंतर तेव्हाचे भाजपचे सुंदरसिंह भंडारी यांनी आपल्या अंगलट यायला नको म्हणून त्यांनी सरळ शिवसैनिकांकडे बोट दाखवलं होतं. तेव्हा स्वत:बाळासाहेबांनी पुढे येऊन सांगितलं होतं की जर शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे. असे म्हणत बाबरी पाडल्याची स्वत:वर घेतली. बाळासाहेब म्हणाले हे कसलं नपुंसक नेतृत्त्व, आपण कार्यकर्त्यांना सांगायचं आणि ते काम झाल्यावर पळून जायचं. असं असेल तर या देशात हिंदू कधीच उभा राहू शकणार नाही. ''

Uddhav Thackeray | Chandrakant Patil :
Uddhav Thackeray News : 'पंतप्रधान मोदींचा बांग्लादेशच्या लढाईत सहभाग, पण बाबरीच्या वेळी हिमालयात..'; ठाकरेंचा सणसणीत टोला

''आता हे सर्व बिळातून बाहेर येऊ लागलेत. इतके दिवस हे सर्व कोणत्या बिळात लपून बसले होते. हे मघलांचा इतिहास पुसता पुसता हे हिंदूंचा इतिहासही पुसायला निघालेत की काय अशी भिती वाटतेय, ज्यांच्याकडे शौर्य नसतं त्यांना शौर्य करायची वेळ येते, भापजकडे कधीही शौर्य नव्हतं. बाबरी पाडल्यानंतर मुंबईत ज्या दंगली झाल्या तेव्हा शिवसेना सत्तेत नव्हती. मुंबई बाळासाहेबांनी, शुर शिवसैनिकांनी वाचवली. ''

एकीकडे भागवत मशिदीत जातायेत आणि दुसरीकडे ते बाबरीसुद्धा आम्हीच पाडली म्हणतायेत, मग यांचं हिंदूत्व नेमकं कोणतं असाही प्रश्न आहे. आमचं हिंदूत्व हे शेंडी जानव्याचं हिंदूत्व नाही, हिंदूत्व हे आमचं राष्ट्रीयत्व आहे. तसं भाजपनेही एकदा त्यांचं हिंदूत्व काय आहे हे सांगावं.''

Uddhav Thackeray | Chandrakant Patil :
Karnataka BJP News : भाजपत मोठी घडामोड : उमेदवार निवडीवर येडियुराप्पा नाराज?; दिल्लीहून तातडीने बंगळूरला परतले

''आमच्याकडेचे मिंधे सत्तेसाठी लाचारी करत, बाळासाहेबांचे विचार यांनी सोडले असं सांगत भाजपकडे गेले, आता त्यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्यावा, किंवा मिंध्यांनी स्वत: मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे. पण बाळासाहेबांचा एवढा अपमान करणाऱ्यांसोबत जर तुम्ही केवळ सत्तेसाठी काय चाटायचं असेल ते चाटा... कारण ज्या मस्तीत चंद्रकांत पाटील बोलतायेत की बाबरी पाडणारे शिवसैनिक नव्हतेच तर त्यांनी एकदा लालकृष्ण आडवाणी यांचा तो व्हिडीओ काढून पाहावा. त्यात त्यांनी स्पष्ट म्हंटलयं की जे लोक बाबरीच्या घुमटावर चढले होते. ते मराठी बोलणारे होते, ते कोणाचही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यावेळी सीबीआयची चौकशी, कोर्टकचेऱ्याही झाल्या आहेत. ''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com