Roha Political Power Show News : राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या रोह्यातच शिवसेनेकडून आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तगडे आव्हान उभे केले जात आहे. येथे आमदार महेंद्र दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे पुन्हा एकदा दळवी आणि तटकरे यांच्यात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांनी केलेल्या वक्तव्याने यात आणखी तेल ओतण्याचे काम केलं आहे. त्यांनी, इतर ठिकाणांपेक्षा आम्ही रोह्यात अधिक लक्ष घालू, असे म्हटले आहे. यामुळे आगामी काळात येथे अधिकच राजकीय संघर्ष होण्याचे आता संकेत मिळत आहेत.
रायगड जिल्ह्यात महायुतीतील वाद अद्याप कमी झालेला नाही. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर शिवसेनेचे जिल्ह्यातील नेते टीका करत असतानाही त्यांनी संयम दाखवत विकासावर लक्ष द्या, असं म्हणत वादावर पडदा टाकला होता. तटकरे यांच्या या आवाहनानंतरही शिवसेनेच्या नेत्यांकडून त्यांना लक्ष्य करण्याची रणनीती आखली जात आहे.
दरम्यान, महेंद्र दळवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष हर्ष पाटील यांच्या नियोजनातून तर शिवसेना युवा नेते आकाश भैया धोत्रे यांच्या पुढाकाराने येथे भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही दहीहंडी लाटणेश्वर-खारी गोविंदा पथकाने फोडत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच १ लाख २१ हजार रुपयांची रोख रक्कम आणि मानाची गदाही जिंकली.
एकीकडे लाटणेश्वर-खारी गोविंदा पथकाची जोरदार चर्चा जिल्ह्यात होत असतानाच, दुसरीकडे तटकरेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची दहीहंडी हा देखील राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे. तर दुसरीकडे विकास गोगावले यांनी केलेल्या वक्तव्याने देखील वात पेटवली आहे. विकास गोगावले यांनी रोह्याच्या विकासाकडे इतर ठिकाणांपेक्षा अधिक लक्ष देणार.
रोह्याकरांच्या मनात जे भरतशेठ यांचे नाव असेल, महेंद्र दळवींचे नाव असेल किंवा आमचे नेते एकनाथ शिंदे यांचे नाव असेल, ते आम्ही कायमस्वरूपी करून टाकल्याशिवाय राहणार नाही, असा शब्द देत असल्याचे विकास गोगावले यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, रोहा तालुक्यात शिवसेनेच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे तटकरे यांचा राजकीय प्रभाव असलेल्या रोहा तालुक्यात शिवसेनेने भव्य दहीहंडीच्या माध्यमातून आपली ताकद दाखवून दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या आयोजनाकडे राजकीय दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे. रोहा तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढत असल्याचे राजकीय चित्रही अधोरेखित होताना दिसत आहे. तर शिवसेनेची दहीहंडी ही रोह्यातील आगामी राजकीय शक्तिप्रदर्शनाची झलक ठरल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.