Gram Panchayat Election : मोठी बातमी! ग्रामपंचायत निवडणुका पुन्हा लांबणीवर; 'या' कारणामुळे 4 ऑगस्टच्या मतदार यादीला स्थगिती

Gram Panchayat election voter list stay: महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडली आहे. 4 ऑगस्टच्या मतदार यादीला स्थगिती मिळाल्यानंतर निवडणुकांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. जाणून घ्या नेमके कारण आणि ताजे अपडेट.
Gram Panchayat election delayed in Maharashtra
Gram Panchayat election delayed in MaharashtraSarkarnama
Published on
Updated on

Pune News: मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकीय राजवट संपून लवकरच लोकनियुक्त प्रतिनिधी येणार अशा आशा पल्लवित झाल्या असतानाच, आता या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. राज्य निवडणूक आयोगाने ४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीला ऐनवेळी 'ब्रेक' लावला आहे.

राज्यात सध्या सुरू असलेल्या 'एसआयआर' मोहिमेमुळे ही स्थगिती देण्यात आल्याने ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याच्या शक्यतांवर आता पाणी फिरले आहे.

'एसआयआर' मोहिमेमुळे मतदार यादीचा ब्रेक !

यापूर्वीच्या नियोजनानुसार ४ ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होऊन लगेचच निवडणुकीचे बिगुल वाजणार होते. इच्छुक उमेदवारांनी गावागावांत बैठका, कॉर्नर सभा, मतदार संपर्क आणि पॅनेल बांधणीला या सर्व गोष्टींच्या तयारीला सुरुवातही केली होती.

Gram Panchayat election delayed in Maharashtra
Dhananjay Mahadik on Congress : "देशात अराजकता माजवण्याचा काँग्रेसचा कट फसला!" भाजप खासदार महाडिक यांचा घणाघाती आरोप

मात्र, मतदार याद्या दोषमुक्त आणि पारदर्शक करण्यासाठी निवडणूक यंत्रणेकडून सध्या 'एसआयआर' मोहीम राबवली जात आहे. ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर प्रसिद्ध होणारी विधानसभा मतदारसंघ निहाय अद्ययावत यादीच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वापरली जावी, अशी विनंती राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.

बोगस व दुबार मतदारांवर चालणार कात्री

आयोगाने ४ ऑगस्टच्या प्रसिद्धीला स्थगिती दिल्याने सुमारे ७५४ ग्रामपंचायतींसह राज्यातील मुदत संपलेल्या सर्वच ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया काही काळ पुढे ढकलली जाणार आहे. मात्र, या निर्णयामुळे मतदार यादीतील मयत, दुबार, स्थलांतरित आणि बोगस मतदारांची नावे वगळून पूर्णपणे अद्ययावत व पारदर्शक यादी हाती येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय गणिते आणि जुळवाजुळव पार बदलून जाणार आहे.

Gram Panchayat election delayed in Maharashtra
Bhaskar Bhagare on CJP : विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी गुंडांचा वापर? खासदार भास्कर भगरेंचा घणाघात; संसदेत आवाज उठवणार!

अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज, छाननी, चिन्ह वाटप आणि प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया पार पडणार होती. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटनांचा धडाका सुरू असतानाच आता या निर्णयामुळे राजकीय वातावरण पुन्हा 'वेट अँड वॉच' मोडवर गेले आहे.

अतिवृष्टी आणि सणासुदीच्या काळासोबतच आता 'एसआयआर' मोहिमेची भर पडल्याने, नवीन अद्ययावत मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरच राज्य निवडणूक आयोग निवडणुकांचे नवे वेळापत्रक जाहीर करेल, हे आता स्पष्ट झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com