Eknath Shinde Sarkarnama
कोकण

Mahayuti Poliitics : "माझं मंत्रीपद साईबाबा ठरवतात, मी मंत्र्यांपेक्षाही वरच्या पदावर जाणार..." मंत्रिपद न मिळालेल्या शिंदेंच्या नेत्याला विश्वास

Deepak Kesarkar Statement On Ministership : महायुती (Mahayuti) सरकारने मंत्रिमंडळ विस्तार करताना धक्कातंत्राचा अवलंब केला. त्यामुळे या मंत्रिमंडळात अनेक दिग्गज आणि माजी मंत्र्यांचा पत्ता कट झाला आहे. तर मंत्रिपद न मिळालेल्या सर्व नेत्यांची मनातील खदखद आता बाहेर येताना दिसत आहे.

Jagdish Patil

Sindhudurg News, 25 Dec : महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तार करताना धक्कातंत्राचा अवलंब केला. त्यामुळे या मंत्रिमंडळात अनेक दिग्गज आणि माजी मंत्र्यांचा पत्ता कट झाला आहे. तर मंत्रिपद न मिळालेल्या सर्व नेत्यांची मनातील खदखद आता बाहेर येताना दिसत आहे.

मंत्रिमंडळात समावेश न केल्याने महायुतीतील अनेक नेत्यांनी आपली नाराजी उघड बोलून दाखवली आहे. यामध्ये भाजपचे (BJP) माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि शिंदेंच्या शिवसेनेचे तानाजी सावंत, दीपक केसरकर यांचा समावेश आहे.

अशातच आता दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी, अनेक लोकांनी मला मंत्रिपद मिळू नये म्हणून प्रयत्न केल्याचा आरोप करत, माझं मंत्रिपद देव ठरवत असतो, मी कदाचित मंत्र्यांपेक्षाही वरच्या पदावर जाईन, असा विश्वास व्यक्त केला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी रामटेक बंगला नाकारल्यानंतर रामटेक बंगला चर्चेत आला आहे. या संदर्भात बोलताना दीपक केसरकर म्हणाले, या बंगल्यात जे जे राहीले ते ते मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचले आहेत. त्यामध्ये शरद पवार, विलासराव देशमुख, शिवाजीराव पाटील नीलंगेकर असे नेते सर्व मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे मी यापेक्षाही मोठ्या पदावर जाईन.

मला पद द्यायला साईबाबा समर्थ आहेत

पण ज्या लोकांनी मला मंत्रिपद मिळू नये म्हणून प्रयत्न केले, त्यांची मला कीव वाटते. माझं मंत्रिपद देव ठरवत असतो, मी कदाचित मंत्र्यांपेक्षाही वरच्या पदावर जाईन. मी साईबाबांचा भक्त आहे. मला पद द्यायला साईबाबा समर्थ आहेत. त्यामुळे जी मला मोकळा श्वास घेण्याची संधी मिळाली त्यामुळे मी आनंदात आहे असं केसरकर म्हणाले.

दरम्यान, नाणार ग्रीन रिफायनरी वरून कोकणातील महायुतीच्या नेत्यांमध्ये मतभिन्नता असल्याचं समोर आलं आहे. कंपनी तयार असेल तर रिफायनरी शंभर टक्के होणार असं खासदार नारायण राणेंनी (Narayan Rane) स्पष्ट केलं आहे. मात्र, माजी मंत्री आमदार दीपक केसरकरांनी ही रिफायनरी 'ग्रीन रिफायनरी' आहे का? हे तपासून पाहाव लागेल, असं म्हटलं आहे.

सामंत जगभराची माहीती आहे

त्यामुळे रिफायनरीवरून दोन नेत्यांमध्ये मतभिन्नता असल्याचं दिसत आहे. तर याच रिफायनरीच्या मुद्यावरून केसरकरांनी आपल्याच पक्षातील नेते उद्योग मंत्री उदय सामंतांनाही टोला लगावला. केसरकर म्हणाले, "उदय सामंत हे एवढे हुशार आहेत, की त्यांच्याबद्दल कोणी काही बोलूच शकत नाही. त्यांना पुर्ण जगभराची माहीती आहे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT