A senior official was allegedly seen checking matka numbers on a mobile phone during the Sawantwadi Panchayat Committee meeting. Sarkarnama
कोकण

Sawantwadi Officer Video : पंचायत समितीच्या मिटिंगमध्ये अधिकाऱ्याला मटक्याच्या आकड्याची काळजी, मोबाईलमध्ये मटका तपासतानाचा व्हिडिओ व्हायरल

Sawantwadi Panchayat Meeting: मागील काही महिन्यांपूर्वी राज्याच्या विधानसभेत तत्कालीन कृषीमंत्री रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर विरोधकांनी हा मुद्दा लावून धरल्याने मंत्री महोदयांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. अशातच आता सावंतवाडी पंचायत समितीत असाच एक धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.

Jagdish Patil

Sawantwadi News, 22 May: राजकीय नेते मंडळी असो वा सरकारी अधिकारी अनेकदा महत्त्वाच्या बैठकांमध्ये ते मोबाईमध्ये डोकं घालून बसल्याचे व्हिडिओ समोर येत असतात. शिवाय अशा प्रकरणांमध्ये संबंधित नेत्यांना, अधिकाऱ्यांना नको त्या वेळी मोबाईल हाताळणं किंवा मोबाईलमध्ये किंवा गेम खेळणं महागात पडल्याची अनेक उदाहरणं यापूर्वी घडली आहेत.

मागील काही महिन्यांपूर्वी राज्याच्या विधानसभेत तत्कालीन कृषीमंत्री रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर विरोधकांनी हा मुद्दा लावून धरल्याने मंत्री महोदयांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. अशातच आता सावंतवाडी पंचायत समितीत असाच एक धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

​सावंतवाडी पंचायत समितीची मासिक बैठक सभापती सुष्मिता जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी सर्वच विभागांचे प्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. वेगवेगळ्या गटांतील सदस्यांकडून महत्त्वाचे प्रश्न सभागृहात मांडले जात होते.

मात्र, याचवेळी बैठकीत जिल्हा परिषदेच्या सावंतवाडी येथील बांधकाम विभागातील एक वरिष्ठ लिपिक मोबाईलवर चक्क मटक्याचा आकडा तपासण्यात बिझी असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या बैठकीला उपस्थित असलेल्या पत्रकारांनीच हा संपूर्ण प्रकार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला केल्यामुळे पंचायत समितीच्या कारभारावर आणि अधिकाऱ्यांच्या कृतीवर संताप व्यक्त केला जात आहे.

शिवाय हा अधिकारी केवळ बैठकीला हजेरी लावायची म्हणून उपस्थित होता की काय? त्याला बैठकीचं गांभीर्य नाही का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर पंचायत समितीच्या सभापती सुष्मिता जाधव आणि उपसभापती गौरव मुळीक यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

तसंच ​सभागृहात घडलेला हा प्रकार अत्यंत गंभीर असून आम्ही या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती घेत आहोत. संबंधित कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर योग्य तो पाठपुरावा केला जाईल, असंही जाधव यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता या अधिकाऱ्यावर कारवाई केली जाणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT