EC Press Conference : निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद, मतदार यादीत घोळ? 'मविआ'च्या 'त्या' 32 हरकतींना मिळणार उत्तर

MVA SIR Election Commission : निवडणूक आयोग आज तीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. दोन दिवासंपूर्वी मविआच्या नेत्यांनी मुख्य निवडणूकअधिकाऱ्यांची भेट घेतली होती.
State Election officials during a press conference on objections raised by Mahavikas Aghadi over the SIR voter verification process.
State Election officials during a press conference on objections raised by Mahavikas Aghadi over the SIR voter verification process. sarkarnama
Published on
Updated on

Election Commission : महाराष्ट्रात SIR प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून राबवली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दोन दिवासंपूर्वी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची भेट घेत 32 हरकती आि सूचना नोंदवल्या होत्या. नेत्यांनी मतदार यादी प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते.

आदित्य ठाकरे यांनी एसआयआर प्रक्रियेला आमचा विरोध नाही मात्र ही प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडावी, असे म्हटले होते. अनेक मतदारांची नावे वगळली जात असल्याची तक्रार मतदार करत आहेत. अशाच प्रक्रियेतून बंगालमध्ये भाजपला फायदा झाला होता, तशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होऊ नये, असा इशारा देखील त्यांनी दिला होता.

महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांची भेट घेत त्यांना दोन दिवसांपूर्वी निवेदन दिले होते. त्यामुळे मविआच्या आक्षेपकांना मुख्य निवडणूक अधिकारी आज पत्रकार परिषदेमधून उत्तर देण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीने बीएलओ नियुक्त्यांच्या संदर्भात देखील गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. त्यमुळे आज दुपारी 3 वाजता मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम पत्रकार परिषदेतून यावर सविस्तर उत्तर देण्याची शक्यता आहे.

State Election officials during a press conference on objections raised by Mahavikas Aghadi over the SIR voter verification process.
Anganwadi Workers News: अंगणवाडी सेविकांना मोठा दिलासा! 45 वर्षांवरील महिलांनाही मिळणार पदोन्नती

एसआयआरसाठी घाई नको...

महाराष्ट्रामध्ये इतक्या निवडणूका नाहीत. निवडणुकीसाठी अजून तीन वर्षांचा कालावधी आहे. त्यामुळे नव्या मतदारांचे मार्गदर्शन, प्रबोधन आणि पडताळणी योग्य पद्धतीने व्हावी. एसआयआरसाठी घाई करू नये, तसेच निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक आणि विश्वासार्ह ठेवण्यासाठी आयोगाने तातडीने मार्गदर्शन तव्वे जाहीर करावीत, अशी मागणी निवडणूक अधिकाऱ्यांना दोन दिवसांपूर्वी भेटलेल्या मविआच्या शिष्टमंडळाने केली होती.

State Election officials during a press conference on objections raised by Mahavikas Aghadi over the SIR voter verification process.
Cockroach Janata Party : 'कॉकरोच जनता पार्टी' बंद पडणार? संस्थापक अभिजीत दीपकेचे वडील म्हणाले, "फॉलोअर्स वाढले तरी, आता चळवळ थांबवावी..."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com