Cockroach Janata Party : 'कॉकरोच जनता पार्टी' बंद पडणार? संस्थापक अभिजीत दीपकेचे वडील म्हणाले, "फॉलोअर्स वाढले तरी, आता चळवळ थांबवावी..."

Abhijeet Dipke Founder of Cockroach Janata Party : एकीकडे अभिजीत दीपके यांनी या चळवळीचं राजकीय पक्षात नक्कीच रुपांतर होईल, पण आता ते सांगण थोडं अवघड असल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे अभिजीतने राजकारणात जाऊ नये, चळवळ आता थांबवावी, अशी प्रतिक्रिया त्यांच्या आई-वडिलांनी दिली आहे.
Cockroach Janata Party | Abhijeet Dipke
Cockroach Janata Party | Abhijeet Dipke | Viral MovementSarkarnama
Published on
Updated on

Cockroach Janata Party : छत्रपती संभाजीनगरमधील अभिजीत दीपके या तरुणाने स्थापन केलेल्या 'कॉकरोच जनता पार्टी'ने देशासह जगभरात धुमाकूळ घातला आहे. अवघ्या 7 दिवसांत या पार्टीचे इन्स्टाग्रामवर 18 मिलियनहून जास्त फॉलोअर्स झाले आहेत. त्यामुळे या पक्षाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

तर सोशल मीडियाद्वारे तयार झालेल्या या चळवळीचे राजकीय पक्षामध्ये रुपांतर होईल का? असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात आहे. यावर आता कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे.

एकीकडे अभिजीत दीपके यांनी या चळवळीचं राजकीय पक्षात नक्कीच रुपांतर होईल, पण आता ते सांगण थोडं अवघड असल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे अभिजीतने राजकारणात जाऊ नये, चळवळ आता थांबवावी, अशी प्रतिक्रिया त्यांच्या आई-वडिलांनी दिली आहे. त्यामुळे आता आगामी काळात 'सीजेपी' अशीच कार्यरत राहणार की, ही मोहिम थांबवली जाणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Cockroach Janata Party | Abhijeet Dipke
Thane Politics : शिवसेनेकडून भाजपचा टप्प्यात कार्यक्रम, अवघ्या 3.5 कोटींचा निधी देत कोंडी; उपमहापौर कृष्णा पाटील आक्रमक

अभिजीतचे आई-वडील नेमकं काय म्हणाले?

एका वृत्तवाहिनीशी बोलताना अभिजीतचे वडील भगवान दीपके म्हणाले, "फॉलोअर्स वाढले तरी आम्हाला चिंता आहे. अभिजीतने राजकारणात जाऊ नये, आता चळवळ थांबवावी. अभिजीतच्या प्रसिद्धीच्या चिंतेने त्याची आई दोन दिवस झोपली नाही, प्रसिद्धीमुळं भीती वाटते, दुसरं काही नाही. उचलून नेतात, अटक करतात, आपल्याला याची काय सवय नाही, आपल्या मुलाला अटक करतील का असं वाटते" अशी भीती भगवान दीपके यांनी व्यक्त केली.

Cockroach Janata Party | Abhijeet Dipke
Sanjay Shirsat : शिवसेनेच्या मेळाव्यात चक्क MIM अन् भाजपच्या कामांचे कौतुक; शिंदेंचा नेता म्हणाला, "तरच आपण राजकारणात टिकू..."

शिवाय यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांचं देखील नाव घेतलं. ते म्हणाले, "संजय राऊत संजय सिंग यांना तुरूंगात टाकलं होतं, कोर्टानं त्यांना निर्दोष सोडलं पण पेपर पाहून भीती वाटते. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही," असं म्हणत भगवान दीपके यांनी आपल्या मुलाच्या प्रसिद्धीमुळे त्यांना सतावत असलेली भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे आता अभिजीत नेमकं काय करणार? आपल्या आई-वडिलांचा सल्ला ऐकणार की देशभरातली तरूणांच्या असंतोषाचे नेतृत्व करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com