Ratnagiri News Sarkrnama
कोकण

Pawar vs Pawar : पवारांच्या राष्ट्रवादीत नेत्याचा प्रवेश; कोकणात अजितदादांच्या गटाला सूचक इशारा

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar Ncp News Ratnagiri :

काही महिन्यांपूर्वी अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर राज्यात दुसरा राजकीय भूकंप झाला. त्यानंतर आता आगामी निवडणुका लक्षात घेऊन शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने अजितदादांच्या गटात गेलेल्या आमदारांना शह देण्याची कंबर कसली आहे. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्यासमोर आता नवा पर्याय देण्याची तयारी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे.

काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. Sharad Pawar यांनी थेट चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात प्रशांत यादव यांना राजकीय बळ देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

प्रशांत यादव यांचे स्वागत करीत चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक महाविकास आघाडीतर्फे लढताना प्रशांत यादव यांना आपण सर्वांनी नक्कीच ताकद देऊया, असे दस्तूरखुद्द शरद पवार यांनी प्रवेशावेळी स्पष्ट केले. चिपळूण काँग्रेसचे प्रशांत यादव यांना मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश कार्यक्रम घेत निकम यांना हा सूचक इशारा दिला आहे.

जे-जे काँग्रेस पक्ष सोडून गेले आहेत. त्यांच्यासमोर आम्ही पर्याय उभा करीत असून तरुण, नवा चेहरा प्रशांत यादव यांच्यानिमित्ताने पुढे आणण्याची संधी मिळाली असल्याचे मत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले. एक-एक मतदारसंघ आम्ही बारकाईने हाताळत आहोत. कोकणातील चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार आहे. या मतदारसंघात आम्हाला तरुण, नवा चेहरा पुढे आणण्याची संधी मिळाली असून त्यांनी उभ्या केलेल्या वाशिष्टी डेअरीच्या प्रकल्पाचेही पाटील यांनी कौतुक केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी माजी मंत्री राजेश टोपे, आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नसीम सिद्दिकी, प्रदेश उपाध्यक्ष व चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम, रत्नागिरी जिल्ह्याचे निरीक्षक बबन कनावजे व रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुरेश बने, राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश शिगवण, प्रांतिकचे सहसचिव बशीर मुर्तुझा, सरचिटणीस प्रशांत पाटील, ज्येष्ठ नेत्या नलिनीताई भुवड, रत्नागिरीच्या महिला जिल्हाध्यक्ष दीपिका कोतवडेकर, अल्पसंख्याकचे जिल्हाध्यक्ष रईस अलवी, युवकचे जिल्हाध्यक्ष नौसीन काझी, राष्ट्रवादीचे चिपळूण तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर आदी उपस्थित होते.

प्रशांत यादव सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. चिपळूण येथे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून चिपळूण तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत अनेक कार्यक्रमांमधून त्यांनी राजकीय अस्तित्व दाखवून दिले. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात ते प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. यावेळी यादव यांच्या समर्थकांनीही प्रवेश केला आहे.

edited by sachin fulpagare

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT