Uday Samant : कोकणाला दुसऱ्या विमानतळाचे स्वप्न, रत्नागिरी टर्मिनलसाठी 100 कोटी

Ratnagiri Airport : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पालकमंत्री उदय सामंत यांची कोटींची उड्डाणे
Uday Samant
Uday SamantSarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri Political News :

दोन दिवसांपूर्वी मुंबईतील लीलावती रुग्णालयात चेकअप करून घेतल्यानंतर उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री पुन्हा सक्रिय झाले आहेत. प्रजासत्ताक दिनी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी 92 कोटींचे प्रशासकीय भवन रत्नागिरीमध्ये उभारले जाणार असल्याची घोषणा केली. तसेच लवकरच रत्नागिरी विमानतळ सेवेत दाखल होईल, असेही जाहीर केले.

रत्नागिरीत विमानतळ (Ratnagiri Airport) विकसित होत असून टर्मिनल इमारतीसाठी 100 कोटी राज्याने मंजूर केले आहेत, अशी घोषणा पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केली. त्याचवेळी काजू बोर्डासाठी ५ वर्षांसाठी 1300 कोटी मंजूर केल्याचीही माहिती दिली. शिवाय आंबा बोर्डाच्या मागणीला तत्वता मान्यता दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच लवकरच साडेनऊ कोटी रुपये आंबा बागायतदारांच्या खात्यात जमा होतील, अशी गूड न्यूजही त्यांनी दिली.

Uday Samant
Deepak Kesarkar News : ...तर जिल्ह्यात 1 लाख रोजगार निर्मिती ; शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांचा दावा

जलजीवन मिशनमधून होणाऱ्या नळपाणी योजनांसाठी 100 कोटी रुपयांची मंजुरी मिळाल्याचे यावेळी उदय सामंत यांनी सांगितले. सिंधुरत्न ही ऐतिहासिक योजना असून महिलांना सक्षम करण्यासाठी या योजनेमधून हाऊसबोट देण्यात आली आहे. महिलांनी चालवलेली हाऊसबोट येणाऱ्या पर्यटकांना पाहायला मिळेल. याचा पर्यटन वाढीसाठी निश्चित उपयोग होणार आहे. तसेच गरिबांच्या मुलांना नासा (NASA) आणि इस्त्रोला (ISRO) पाठवणारा राज्यातील पहिला जिल्हा रत्नागिरी (Ratnagiri) ठरला आहे, असेही सामंत यांनी आवर्जून सांगितले.

रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्याचा 300 कोटींचा आराखडा असून, शासन निश्चित यावर्षी रक्कम वाढवून देईल. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासात भर पडेल, असा दावा उदय सामंत यांनी केला. रत्नागिरीत होणाऱ्या पोलिसांच्या गृहप्रकल्पाला 150 कोटींची मंजुरी मिळाली आहे. तसेच पोलिसांची वाहने, सीसीटीव्हीचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केल्याचाही दावा सामंत यांनी केला.

सिटी बसमध्ये महिलांना सवलत

एसटीप्रमाणेच ग्रामीण भागातून येणाऱ्या सीटी बसचे तिकीटदेखील महिलांना 50 टक्क्यांत मिळणार असून याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले. तसेच देशातला पहिला थ्रीडी मल्टीमीडिया शो येथे होत आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा राज्यातील सर्वात उंच पुतळ्याचा लोकार्पण सोहळा 4 फेब्रुवारीला होत असल्याचेही उदय सामंत यांनी सांगितले.

(Edited by Avinash Chandane)

Uday Samant
Raigad Lok Sabha Constituency: रायगडमध्ये स्वत:ची ताकद दाखवण्याची सुनील तटकरेंना संधी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com