Sindhudurg district bank loan controversy; Deepak Kesarkar, Eknath Shinde And Rajan Teli sarkarnama
कोकण

Deepak Kesarkar : तळकोकणात शिंदेंच्या शिवसेनेत तणाव? राजन तेलींचा थेट आमदार केसरकरांवर हल्लाबोल

Rajan Teli On Deepak Kesarkar : शिंदेंच्या शिवसेनेचे नेते राजन तेली यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवरून पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला असून त्यांनी यासंदर्भात थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेवू. त्यांच्याकडे न्याय न मिळाल्यास आपण उच्च न्यायालयाचे दार ठोठावू असा इशारा दिला आहे.

Aslam Shanedivan

  1. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील कर्जवाटपावरून राजन तेली यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

  2. अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळ बरखास्त करण्याची त्यांनी थेट मागणी केली.

  3. आमदार दीपक केसरकरांवरील वादग्रस्त वक्तव्यामुळे तळकोकणात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Sindhudurg News : तळकोकणात पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवरून वादाची ठिणगी पडली असून शिंदेंच्या शिवसेनेचे नेते माजी आमदार राजन तेली यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी कर्जवाटपावरून बँकेचे अध्यक्षांसह मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाला बरखास्त करा अशी मागणी केलीय. यावरून आता तळकोकणात खळबळल उडाली असून राजन तेली यांनी थेट आमदार दीपक केसरकर यांना देखील खडेबोल सुनावत 'ते हवेत असतात...', असे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यामुळे आता तळकोकणात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

राजन तेली यांनी याआधी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर जिल्हा बँकेच्या कर्ज वाटवापरून जोरदार निशाना साधत तेच बँकेच्या भ्रष्टाचाराला जबाबदार असल्याचे म्हटले होते. तसेच त्यांनी याबाबत सहकार खाते आणि नाबार्ड तक्रार केल्याचे सांगितले होते. यावरून केसरकर यांनी राजन तेलींना सल्ला देत त्यांनी असे आरोप करत बँकेची बदनामी करू नये असे म्हटले होते.

आता त्यांनी याच सल्ल्यावर संताप व्यक्त केला असून थेट केसरकर आणि त्यांच्यातील फरक ही माध्यमांच्या समोर सांगितला आहे. त्यांनी, केसरकर काय म्हणतात याला अर्थ नाही. केसरकर हवेत असून ते कोणाच्या प्रेमातही कोणाशी वाकडं घेत नाहीत. तसा प्रयत्नही करत नाहीत आणि कोणाला घाबरत नाही. हाच फरक असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तर बँकेच्या बाबतीत आपण त्यांना भेटलो असून सर्व माहिती दिली आहे. जर त्यांना या गोष्टींची कल्पना असती तर ते असं बोलले नसते, असाही टोला त्यांनी लगावला आहे.

तर लालण-चालण न करता मी घोटाळा बाहेर काढत आहे. या गोष्टी जर योग्य असतील तर मी कशाला बँकेची बदनामी करू असाही सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तर आपण या बँकेत ७ वर्ष काम केलं असून बँक, बँकेचे कर्मचारी आणि शेतकऱ्यांबद्दल आपुलकी आपली आहे. ते सर्व मेहनत बँकेसाठी करत आहेत. मात्र काही ठराविकच लोक बँकेबद्दल असं काम करत आहेत. बँकेचे अध्यक्ष मनिष दळवींना हे का नको आहे? इतर सर्व अध्यक्ष बदलून गेले पण दळवीच अजुनही तेथेच कसे आहेत? असाही सवाल त्यांनी केला आहे.

हा विषय गांभीर्याने घेतला गेला नाही तर आपणच काय तर केसरकरही शेतकऱ्यांना न्याय देवू शकणार नाहीत. त्यामुळे मी कोणतेही आरोप असेच हवेत करत नसून त्याचे पुरावे दिले आहेत. हवे तर ते केसरकर यांनाही दाखवा.

जर त्यांनी हे पुरावे खोटे असल्याचे सांगितले तर मी दिलगिरी व्यक्त करायला तयार असल्याचे म्हणत थेट केसरकर यांनाच आव्हान दिले आहे. तर त्यांच्याच मतदारसंघातील एक प्रकरण असून त्यांनी ग्रामसेवकाला घरी बोलवून शहानिशा करावी असे म्हणत आपण कधीच हवेत आरोप करत नसून हवेत वाद नसतात असे म्हणत टोला लगावला आहे.

FAQs :

1. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवरून वाद का निर्माण झाला आहे?
➡️ कर्जवाटपात कथित गैरप्रकार झाल्याच्या आरोपांमुळे हा वाद निर्माण झाला आहे.

2. राजन तेली यांनी काय मागणी केली आहे?
➡️ बँकेचे अध्यक्ष, सीईओ आणि संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

3. दीपक केसरकर यांच्याबाबत काय वक्तव्य करण्यात आले?
➡️ राजन तेली यांनी त्यांच्यावर टीका करत ‘ते हवेत असतात’ असे वादग्रस्त वक्तव्य केले.

4. या प्रकरणामुळे राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
➡️ तळकोकणात शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत तणाव वाढण्याची शक्यता आहे.

5. पुढील कारवाई काय अपेक्षित आहे?
➡️ कर्जवाटपाची चौकशी व बँक कारभारावर प्रशासकीय निर्णय होण्याची मागणी होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT