Deepak Kesarkar : महायुतीत नवा वाद! केसरकरांचे धक्कादायक वक्तव्य; म्हणाले, 'भाजपला मत म्हणजे...', शेलारांचे जोरदार प्रत्युत्तर

Ashish Shelar Hits Back Deepak Kesarkar After he Targets BJP : नगरपालिकेच्या निवडणुकीवरुन तळकोकणात राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
Deepak Kesarkar And Ashish Shelar
Deepak Kesarkar And Ashish Shelarsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. सिंधुदुर्गात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निलेश आणि नितेश राणे यांच्या संघर्षात आता दीपक केसरकरांनी भाजपवर टीका करत नवा वाद पेटवला.

  2. केसरकरांनी “विरोधकांना मत म्हणजे भाजपला मत” असे वक्तव्य करून चर्चांना उधाण आणले.

  3. या विधानावर भाजपचे नेते अशिष शेलार यांनी तीव्र प्रतिक्रिया देत केसरकरांची मतवापसी होईल असे म्हटले.

Sindhudurg News : तळकोकणातली सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या ऐन निवडणुकीत आणि मतदानाच्या आधीच भाजप विरुद्ध शिंदे शिवसेना वाद चांगलाच पेटला आहे. येथे निलेश राणे विरूद्ध नितेश राणे असा संघर्ष सुरू असतानाच आता शिंदेंच्या शिवसेनेचे माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी भाजपला पुन्हा डिवचले आहे. त्यांनी विरोधकांना मत देणं म्हणजे भाजपला मत देण्यासारखं असल्याचे म्हटलं आहे. या खळबळजनक वक्तव्यानंतर आता चर्चांना उधाण आले असून यावर अशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं असून केसरकरांची मतवापसी होईल असे त्यांनी म्हटलं आहे.

नगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान तळकोकणात राजकीय वातावरण तंग झाले आहे. येथील सिंधुदुर्ग जिल्ह्याती राजकीय वातावरण राणे बंधुंतील संघर्षामुळे चांगलच तापले असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. अशातच शिवसेनेचे माजी मंत्री दीपक केसरकर यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. त्यांनी सावंतवाडी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला चार मराठी शब्द बोलता येत नाहीत. येथे मालवणी बोलली जाते. मात्र ज्यांना मालवणी शुद्ध बोलता येते नाही त्या शहर काय सांभाळणार असा टोला भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रध्दा सावंत भोसले यांना लगावला आहे.

तसेच सावंतवाडी हे शहर माफियांच्या हातात जाऊ नये म्हणूनच आत येथे निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. यासाठी आम्ही युती व्हावी म्हणून खूप प्रयत्न केले. मात्र ना आमचे ऐकले नाही नारायण राणे यांच्यासारख्या नेत्याचं. म्हणून मी आजही ठासून सांगत आहे की माझ्यासह नारायण राणेंचं राजकीय अस्तित्व संपवण्याचा कट रचला जातोय.

Deepak Kesarkar And Ashish Shelar
Deepak Kesarkar : हास्यास्पद म्हणणाऱ्या नितेश राणेंवर केसरकरांनी तोफ डागली; दहशतवादाचा मुद्दा घेऊन माझी ‘ती’ लढाई...

राणे साहेबांना या निवडणुकीच्या प्रचारापासून दूर ठेवण्यात आलं आहे. यामुळेच तर हा संशय अधिकच वाढत आहे. नारायण राणे यांनी युती करायला सांगितली होती, मात्र षडयंत्र करून युती केली असा हल्लाबोल नाही केसरकर यांनी पुन्हा एकदा भाजपवर केला आहे. तर नारायण राणे यांच्या सोबत आपला राजकीय संघर्ष झाला, मात्र तो संघर्ष विचारांचा होता. आता आम्ही एकत्र आहोत असेही केसरकर म्हणाले.

तसेच त्यांनी, सावंतवाडी हे शहर माफियांच्या हातात जाऊ नये, म्हणून आपण प्रयत्न करत असून भाजपला मत म्हणजे विरोधकांना मत देण्यासारखं आहे. विरोधी उमेदवारांना भाजप फायनान्स करत आहे. हे कशासाठी तर फक्त आमची मतं खायची आहेत म्हणून. त्यामुळे हे लक्षात घ्या की विरोधी पक्षाला जी मतं दिली जाणार ती भाजपला दिल्या सारखी आहेत. त्यांना अजिबात मते देवू नका. कारण ते कधीच निवडून येणार नाहीत. हे एक षडयंत्र असून नारायण राणे यांनी युतीचे आदेश दिले होते. मात्र भाजपने ते पाळले नाहीत आणि आपल्या विरोधात आज उभे झाले आहेत, अशी टीका केली आहे.

आता केसरकरांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं असून खळबळ उडाली आहे. यावरून भाजपचे नेते मंत्री अशिष शेलार यांनी, जसं घर वापसी होते. तशी मतवापसीही होऊ शकते. यामुळे केसरकर यांचीही मतवापसी होईल असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर होणाऱ्या आरोप आणि टीकेला उत्तर देताना, काही लोक येथे मालवणला बदनाम करण्याचे काम करत आहेत. आपल्यात राजकीय भेद असतील, पक्ष भेद असतील पण जर कोणी मालवणच्या माणसाला नख लावण्याचे काम करत असले तर हे भाजप कदापि सहन करणार नाही.

तसेच रवींद्र चव्हाण यांनी येथे योग्य उमेदवार दिलेच आहेत. तसेच मंत्री असतानाही येथील रस्त्यांचा चेहरा-मोहराही बदलून टाकला. त्यामुळे त्यांच्यावर होणारे हल्ले, आरोप भारतीय जनता पक्ष सहन करणार नाही. निवडणूका येतील जातील पण सुर्यावर थुंकण्याचा जो पर्यत करेल थुंकी त्यांच्याच तोंडावर उडेल. हेही टीका करणाऱ्यांनी लक्षात घ्यावं अशी टीका नाव न घेता निलेश राणेंवर केली आहे.

Deepak Kesarkar And Ashish Shelar
Deepak Kesarkar : केसरकरांचं वक्तव्य ‘हास्यास्पद’! नितेश राणे म्हणतात, निलेश राणेंबाबत उदय सामंत आणि शिंदेंची शिवसेना गप्प का?

FAQs :

1. दीपक केसरकरांनी नेमके काय वक्तव्य केले?
त्यांनी म्हटले की “विरोधकांना मत देणं म्हणजे भाजपला मत देण्यासारखं.”

2. केसरकरांच्या वक्तव्यावर कोणाने प्रतिक्रिया दिली?
अशिष शेलार यांनी तीव्र प्रतिक्रिया देत त्यांची मतवापसी होईल असे सांगितले.

3. सिंधुदुर्गात नेमका वाद कशामुळे पेटला आहे?
भाजप–शिंदे शिवसेना संघर्ष आणि राणे बंधूंचा वाद यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

4. राणे बंधूंच्या वादाचा या वक्तव्याशी संबंध आहे का?
होय, दोघेही आपल्या पक्षांच्या बाजूने वेगवेगळे भूमिका मांडत असल्याने तणाव वाढला आहे.

5. या प्रकरणाचा निवडणूक वातावरणावर काय परिणाम झाला?
निवडणुकीपूर्वी कोकणात चर्चांना उधाण आले असून पक्षांमध्ये आरोप–प्रत्यारोप वाढले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com