Shishir Dharkar, Uddhav Thackeray, Anant Gite Sarkarnama
कोकण

Shishir Dharkar In Shivsena UBT : पाचशे कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असलेले शिशिर धारकर ठाकरेंच्या सेनेत

Pen Assembly Constituency : पेणचा आमदार ठाकरे गटाचाच असणार, अनंत गीतेंची ग्वाही

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : पेण विधानसभा मतदारसंघाचा पुढचा आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचाच असेल, अशी ग्वाही माजी खासदार अनंत गीते यांनी दिली. पेणचे माजी नगराध्यक्ष शिशिर धारकर, मिहीर धारकर, समीर म्हात्रे यांच्यासह कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते शिवबंधन बांधण्यात आले. यावेळी गिते बोलत होते. दरम्यान, शिशिर धारकरांवर पेण अर्बन बँकेत ५०० हून अधिक कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहेत. त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळातून भूवया उंचावल्या आहेत. (Latest Political News)

धारकर २५० गाड्यांचा ताफा घेऊन धारकर 'मातोश्री'वर दाखल गेले होते. त्यांच्यासोबत पेण, सुधागड, रोहा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. धारकर हे गेली अनेक वर्ष राजकारणापासून लांब होते. दरम्यान, शिशिर धारकरांनी ठाकरे गटात प्रवेश करण्यासाठी दोन-तीन भेटी घेतल्याची चर्चा आहे. मात्र काही कारणांनी हा प्रवेश लांबणीवर पडला होता. आता मात्र ते पदाधिकारी कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात दाखल झाल्याने पेणमध्ये भाजपसमोर मोठे आव्हान असणार असल्याचे बोलले जात आहे.

धारकरांच्या प्रवेशावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, "तुम्ही लढवय्या सेनेत आला आहात, बाकीचे पळपुटे आहेत. काही जण फक्त डोळे वटारले तरी पटकन बिळात शिरतात. तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये जाण्याऐवजी अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या सेनेत आला आहात. आपल्याला फक्त पेणचाच आमदार नाही, तर चांदा ते बांदा सत्ताबदल करायचा आहे, असे म्हणत ठाकरेंनी भाजपविरोधात दंड थोपटले.

आता पेणमध्ये आपलाच आमदार असणार असल्याचा विश्वास अनंत गीतेंनी व्यक्त केला. तर उपस्थित कार्यकर्त्यांनी प्रवेश करताना जो जोश दिसला तोच जोश मतदारसंघात दिसेल. हा प्रवेश राजकारणाला कलाटणी देणारा ठरणार असल्याचे सांगितले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या प्रवेशामुळे पेन विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाची ताकद वाढली आहे. पेनचा आमदार ठाकरे गटाचाच करणार असल्याचा निर्धारही यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT