Rahul Shewale Defamation Case: उद्धव ठाकरे - संजय राऊतांना दिलासा; राहुल शेवाळे बदनामी प्रकरणी जामीन मंजूर

Uddhav Thackeray and Sanjay Raut: माझगाव कोर्टाने सोमवारी 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर केला
Uddhav Thackeray and Sanjay Raut
Uddhav Thackeray and Sanjay Raut Sarkarnama

Mumbai News : शिवसेना (शिंदे गट) खासदार राहुल शेवाळे यांच्या बदनामी प्रकरणी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. शिवसेनेच्या (ठाकरे गट) मुखपत्रामध्ये बदनामीकारक मजकूर छापून आल्याचा आरोप करत राहुल शेवाळे यांनी कोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणी माझगाव कोर्टाने सोमवारी 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर केला आहे.

राहुल शेवाळे बदनामी प्रकरणाची आता पुढची सुनावणी १४ सप्टेंबरला होणार आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीला उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजर होते. यावेळी शेवाळे यांनी केलेले आरोप आपल्याला मान्य नसल्याचे ठाकरे यांनी कोर्टाला सांगितले. या सुनावणीसाठी संजय राऊत हे कोर्टात उपस्थित होते.

Uddhav Thackeray and Sanjay Raut
Shrirampur politics : निवडणुकांपूर्वीच श्रीरामपुरचे राजकारण तापले ; अंतर्गत कुरघोडीमुळे पक्ष बदलाला प्राधान्य

"शिवसेनेच्या (ठाकरे गट) मुखपत्रामध्ये माझी बदनामी करण्यात आली आहे", असा आरोप करत राहुल शेवाळे यांनी मानहाणीचा दावा ठोकला होता. तसेच संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी माफी मागावी, अशी मगणीही शेवाळेंनी केली होती.

मात्र, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी शेवाळेंनी केलेले आरोप मान्य नसल्याचे कोर्टात सांगितले. यानंतर माझगाव कोर्टाकडून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना जामीन मंजूर करण्यात आला. आता कोर्टाच्या पुढच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com