Guardian Minister Raigad Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar And Bharat Gogawale sarkarnama
कोकण

Bharat Gogawale : रायगडमध्ये गोगावलेंचा महायुतीला कडक इशारा, राऊतांनाही झापलं; म्हणाले, 'आम्ही मेलेल्या आईचं दूध...'

Bharat Gogawale On Mahayut, Sanjay Raut And Raigad guardian minister post : आगामी स्थानिकच्या पार्श्वभूमिवर कोकणासह राज्यात प्रमुख राजकीय पक्ष जोरदार तयारी करताना दिसत आहेत. एकनाथ शिंदेची शिवसेना देखील आक्रमकपणे मोर्चे बांधणी करत आहे.

Aslam Shanedivan

  1. शिवसेना (शिंदे गट) नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी महायुतीला इशारा देत स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले.

  2. त्यांनी खासदार संजय राऊतांवर जोरदार टीका केली.

  3. रायगडचा पालकमंत्री आपणच होणार आणि नवरात्रीनंतर पालकमंत्री पदाचा प्रश्न सुटेल असा दावा त्यांनी केला.

Raigad News : रायगड जिल्ह्यातील प्रलंबित पालकमंत्री पदाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जोरदार रस्सीखेच होताना दिसत आहे. यामुद्द्यासह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्याबाबत मंत्री भरत गोगावले यांनी मोठे भाष्य केलं आहे. त्यांनी महायुतीला इशारा देत निवडणुका स्वतंत्र लढण्याची आमची देखील तयारी असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे कोकणातील वादाच्या ठिणगीमुळे राज्यभर महायुतीला तडे जाण्याची शक्यता आहे. ते चिपळूनमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर एकनाथ शिंदेची शिवसेना आक्रमकपणे नियोजन करताना दिसत आहे. याचदरम्यान रायगडमध्ये अद्याप न सुटलेल्या पालकमंत्रीपदाच्या वादावर आणि आगामी स्थानिकच्या निवडणुकीवर गोगावले यांनी मोठे भाष्य केलं आहे. त्यांनी, आम्ही देखील मेलेल्या आईचे दूध प्यायलेलो नाही, गरज पडल्यास आम्ही स्वबळावर लढू. पण आमची पहिली भूमिकाही महायुती म्हणून लढावं ही असेल. गोगावले यांचे हे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरली असून महायुतीला चेतावणी देणारे असल्याचे बोलले जात आहे.

त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली आहे. संजय राऊत यांनी बोलताना काही गोष्टी उगाच अंगावर ओढावून घेऊ नयेत. आधी त्यांच्याकडूनच चुकीचे विधान येतात त्यामुळे आमच्या मावळ्याकडून देखील त्यांच्याबाबत उद्गार निघतात. त्यामुळे त्यांनी तारतम्य ठेवावं असा सल्लाही गोगावले यांनी दिला आहे.

यावेळी महायुती सरकार सत्तेत येऊन आता आठ महिने होत आहेत. तरीही रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री नियुक्त झालेला नाही. यावरूनही त्यांनी भाष्य करताना, मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील, असे बोलून आपलं अंग काढलं आहे.

पण यावेळी त्यांनी नवरात्रीनंतर पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल. मी देवीला साकडे घालणार असून मी देवीचा खरा भक्त असेल तर मलाच पालकमंत्री पद मिळेल. माझा पालकांमंत्री पदासाठी हट्ट नाही पण आग्रही आहे. जो हक्क आहे तो का सोडावा? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान रायगडच्या पालकमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून जोरदार मागणी होतच आहे. पालकमंत्री पद भरत गोगावले यांनाच मिळावे अशीही मागणी केली जात आहे. तर तशीच मागणी राष्ट्रवादीकडून होताना दिसत आहे. यामुळे अद्याप या प्रश्न मार्गी लागलेला नाही.

FAQs :

1. भरत गोगावले कोणत्या गटाचे नेते आहेत?
ते शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे नेते आहेत.

2. त्यांनी महायुतीला कोणता इशारा दिला?
शिवसेना स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचा इशारा दिला.

3. गोगावले यांनी कोणावर टीका केली?
खासदार संजय राऊतांवर.

4. रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत त्यांनी काय दावा केला?
ते रायगडचे पालकमंत्री होतील, असा दावा केला.

5. पालकमंत्री पदाचा प्रश्न कधी सुटणार असल्याचे त्यांनी सांगितले?
नवरात्रीनंतर हा प्रश्न सुटेल असे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT