Bhaskar Jadhav role controversy Sarkarnama
कोकण

Bhaskar Jadhav role controversy : शिवसेना फुटीवेळी आम्ही ठाकरेंबरोबर, भास्कर जाधवांचा बैठकीत आरडाओरडा अन्..; जयस्वालांनी शपथ घेऊन सांगितला प्रसंग!

ShivSena Split: Big Claim by Shinde Sena Ashish Jaiswal on Bhaskar Jadhav Role in Uddhav Thackeray Meeting : शिवसेना फुटीवेळी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर सुरू असलेल्या बैठकीत भास्कर जाधवांनी घेतलेल्या भूमिकेवर आशीष जयस्वाल यांचा मोठा दावा केला आहे.

Pradeep Pendhare

Ashish Jaiswal claim : शिवसेना फुटी होती. एकनाथ शिंदे सुरतला गेले होते. त्यावेळी आम्ही वर्षा बंगल्यावर, उद्धव ठाकरेंबरोबर होतो. बैठक सुरू होती. भाजपबरोबर जाण्यासाठी गळ घालत होतो. उद्धव ठाकरे देखील सकारात्मक होते. जवळपास 50 टक्के आम्हाला त्यांचे मन वळवण्यात यश आले होते.

पण तेवढ्यात भास्कर जाधवांची एन्ट्री झाली. त्यांनी आरडाओरडा सुरू केला. खूप आरडाओरडा केला. सर्व गेले तरी चालतील, पण मी एकटा जाणार नाही, असे सांगत सुटले. मग आमच्या लक्षात आलं की, केस संपली. आम्ही तेथून निघालो. नागपूर रामटेकचे एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार आशीष जयस्वाल यांनी शिवसेना फुटीवेळी रात्री घडलेला प्रसंग शपथ घेऊन सांगितला.

शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाळी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर बैठकीसाठी वर्षावर कोण-कोण होतं, याची माहित आशीष जयस्वाल यांनी दिली. स्वतः मी, गुलाबराव पाटील, दादा भुसे, दीपक केसरकर, लांडेमामा, प्रकाश सुर्वे पुढे निघून गेले होते, मंगेश कुऱ्हाडकर, सदा सरवणकर, योगेश कदम आम्ही वर्षा बंगल्यावर उद्धव ठाकरेंबरोबर होतो, अशी माहिती आशीष जयस्वाल यांनी दिली.

उद्धव ठाकरेंबरोबर आमची बैठक सुरू होती. आम्ही आमची भूमिका मांडत होतो. खूप समजावत होतो. भाजपबरोबर (BJP) वाद झाले होते. मुख्यमंत्रीपदासाठी आपण युती तोडली, युती तोडल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा सव्वा दोन वर्षांचा कार्यकाळ झाला आहे. पण आता भाजपसोबत गेलं पाहिजे, अशी आमची भूमिका होती. ती ठाकरेंसमोर त्यावेळी मांडत होतो, असे जयस्वाल यांनी सांगितले.

यांच्यासोबत, म्हणजेच (काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस) बाळासाहेबांची विचारधारा नाही, हिंदुत्वाची विचार नाहीत, इथं जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, माता-भगिनींनो, हे इथं काही होऊ शकत नाही. पक्षातील कार्यकर्त्यांची खदखद होती. आम्ही सर्वांनी खूप समजावलं होतं. 50 टक्क्यापर्यंत त्यांचा (उद्धव ठाकरे) माईंड देखील बदलला होता, असा दावा आशीष जयस्वाल यांनी केला.

जाधवांचा आरडाओरडा अन्...

परंतु अचानक भास्कर जाधव तिथं आले. खूप जोराने ओरडू लागले. हे मी शपथ घेऊन सांगतो, यात एकही शब्द चुकीचा नाही, असे म्हणत, त्यावेळी त्यांनी खूप ओरडाओरडा केला, सर्व गेले तरी चालेल, मी एकटा जाणार नाही. यामुळे ते (उद्धव ठाकरे) डिस्टर्ब झाल्याचे आशीष जयस्वाल यांनी सांगितले. यानंतर मच्या लक्षात आलं की, ही केस सुधारण्यापलीकडे आहे, यात काही होत नाही. एक- एक करत सर्व निघालो, सर्वात शेवटी मी निघालो. सर्वांना काढल्यानंतर मी निघालो, असा दावा आशीष जयस्वाल यांनी केला.

जयस्वाल यांना काय प्रत्युत्तर मिळणार?

आशीष जयस्वाल यांनी हा सर्व प्रसंग 'सकाळ माध्यम समूह'च्या साम मराठी वृत्तवाहिनीवरील 'ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट' या सादरातील मुलाखतीत सांगितला. जयस्वाल यांच्या दाव्यानुसार शिवसेना फुटीला भास्कर जाधव यांचा आरडाओरडा कारणीभूत ठरला. अप्रत्यक्षरित्या जयस्वाल यांनी भास्कर जाधवांवरच शिवसेना फुटीचे खापर फोडले. यावर भास्कर जाधव काय प्रतिक्रिया देतात, याकडे आता लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT