Bhaskar Jadhav Sarkarnama
कोकण

Bhaskar Jadhav : 'शिस्त पाळणारा नेता, पण मनात घुसमट! भास्कर जाधवांचा पुन्हा संताप! 'पक्षातील बडवे' म्हणत घणाघात

Shivsena UBT Politics : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा पक्षावर नाजारी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांची अद्याप नाराजी कायम असल्याचीच चर्चा राज्यभर सुरू आहे.

Aslam Shanedivan

Ratnagiri/Chiplun News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव शिवसेनेत नाराज असल्याच्या अनेकदा कुजबूज सुरू होती. पण आता त्यांची नाराजी समोर आली असून त्यांनी निवृत्तीचे संकेतही दिले होते. यामुळे कोकणासह राज्यभर हा विषय चांगलाच चर्चेत आला होता. यानंतर त्यांची नाराजी दूर केली जाईल असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले होते. पण ही नाराजी अद्याप कायम असल्याचे उघड झाले असून भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा पक्षावर नाजारी व्यक्त केली आहे. त्यांनी जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुख यांच्या बैठकीत पक्षातील काही बडवे म्हणत संताप व्यक्त केला आहे.

भास्कर जाधव यांनी आपली नाराजी व्यक्त करताना, पक्षातील काही बडव्यांवर जोरदार टीका केली. तसेच पहिल्या फळीतील नेत्यांच्या कार्यपद्धती आपल्याला पटत नसल्याचे सांगत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने शिवसेनेत नेमकं काय सुरू आहे? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

भास्कर जाधव यांनी, आपल्या मनातील नाराजी व्यक्त करताना, विधानसभेला विदर्भाची जबाबदारी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याकडे दिली होती. पण उमेदवाराला एबी फॉर्म देताना आपल्याला विचारत घेतलं गेलं नाही. आधीच एबी फॉर्म दिल्याचे नंतर मला सांगण्यात आले. मात्र ते कोणी दिले? कसे दिले? याची काहीच माहिती नव्हती. पण आपल्याकडे जबाबदारी दिली असताना किमान काही गोष्टींची माहिती तर असायला हवी. ती स्थानिकांनी द्यायला हवी होती. पण तसे झाले नाही, असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.

तसेच भास्कर जाधव यांनी, मागील काही वर्षात आरल्या पक्षातले अनेक नेते, पदाधिकारी सोडून गेले. ते फुटले. पण याची माहिती आपल्या नेत्यांना नव्हती? तर लोक आपल्याला का सोडून जातायतं? त्यांच्या अडचणी काय आहेत? हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न झाला नाही. पण आता ते प्रश्न जाणून घेऊन ते सोडवायला हवेत असाही सल्ला भास्कर जाधव यांनी दिला आहे.

दरम्यान भास्कर जाधवांच्या या नाराजी नाट्यामुळे कोकणात सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. यावरून माजी खासदार विनायक राऊत यांनी, जाधवांच्या नाराजीबद्दल कोणतीच माहिती नाही. तसेच आमच्या कानावर देखील काही आलेलं नाही. उमेदवारांबाबत पक्ष प्रमुख निर्णय घेतात. यात काही इतर नेत्यांचाही सहभाग असतो. पण आता जाधव नाराज असतील. त्याचे काही प्रश्न असतील तर त्यांनी उद्धव ठाकरे त्यांच्याशी बोलावं. त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे सतत उघडे आहेत.

तर मुंबईत पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमावेळी भास्कर जाधव यांनी, उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी आपल्याला कधीच अपोईटमेंटची गरज लागली नाही. तक कधीच गेटवर कोणी एक सेकंदही अडवलं नाही. सर्व सुरक्षारक्षक माझी गाडी ओळखतात. त्यामुळे ती कधीच अडवली जात नाही. पण मी माझी शिस्त न मोडता गेटवर थांबून चेक केल्यानंतरच पुढे जातो. यामागे माझ्या नेत्याची सुरक्षा महत्वाची आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंशी बोलावं असं मला वाटत नाही, असेही त्यांनी सांगितलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT