Kokan Political News : कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत थेट महायुतीच्या उमेदवारा विरोधात दंड थोपाटल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वाद पुन्हा एकदा चर्चेत आला होता. प्रदेशाध्यक्ष सुनाल तटकरे यांच्या मुलाला जाहीर झालेल्या उमेदवारी नंतर आमदार महेंद्र थोरवे आणि त्यांची कन्या जुईली जुईकर-दळवी यांनी उघड विरोध केला. तसेच अपक्ष असा अर्ज देखील दाखल केला.
पण पक्षादेशानंतर माघारीच्या एक दिवस आधी त्यांना आपला अर्ज माघार घ्यावा लागला. यानंतर आज प्रत्यक्ष माघारीच्या दिवशी मविआच्या उमेदवाराने देखील माघार घेतली. त्यापाठोपाठ इतर उमेदवारींनी देखील आपले अर्ज मागे घेतले. यामुळे अनिकेत तटकरे माजी आमदार आता पुन्हा आमदार झाले. या सर्व घडामोडीनंतर आता आमदार महेंद्र दळवी यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ज्याची आता राज्यभर चर्चा होताना दिसत आहे. तसेच शिवसेनेतील बेबनाव देखील उघड होताना दिसत आहे.
दळवी यांची पोस्ट जशीच्या तशी...
“माझ्या तमाम कोकणवासीयांना
माझा सप्रेम नमस्कार”
गेल्या काही दिवसांतील राजकीय घडामोडींमुळे अनेक कार्यकर्ते आणि हितचिंतक भावनिक झाले आहेत. हा संघर्ष कोणत्याही व्यक्तीविरोधात नव्हता. तर कोकणाच्या विकासासाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी होता.
माझ्या राजकीय प्रवासातील एका पर्वाचा अंत आपण स्वतः केला होता. पण आज दुसऱ्या एका राजकीय पर्वाचाही अंत झाला असता. पण कोकणातील माझ्याच काही नेत्यांनी माझा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न केला. पक्षाचे मुख्य नेते आदरणीय मा.ना. एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशाचा मान राखत आणि पक्ष शिस्तीला सर्वोच्च प्राधान्य देत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय स्विकारला आहे.
तरीही जनतेचं प्रेम, कार्यकर्त्यांची साथ आणि वरिष्ठांबद्दलचा आदर यामुळे मी खंबीरपणे उभा आहे. राजकारणात चढ-उतार होत राहतात, पण जनतेचा विश्वास कायम राहतो. कोकणाची सेवा हेच माझे ध्येय आहे आणि यापुढेही त्याच प्रामाणिकपणाने आपल्या सेवेत राहणार आहे. आजचा दिवस कोकणवासीयांचा नसला तरी येणारा उद्याचा सूर्योदय माझ्या कोकणवासीयांचा असेल. जय महाराष्ट्र!
अशी दळवी यांनी भावनिक पोस्ट केली आहे. या पोस्टनंतर आता राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. तसेच शिवसेनेतील सटेलमेंटची देखील चर्चा रंगली असून फक्त पालकमंत्री पदासाठीच ही डिल झाली ज्यात शिवसेनेनं दळवींचा राजकीय बळी दिला अशीही दबक्या आवाजात आता चर्चा होताना दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.