Vidhan Parishad Election : विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीवर 10 मतदारसंघात नामुष्की : मुख्य उमेदवारांनीच तोंडावर पाडलं; गेमच पालटल्याने महायुती विजयाच्या उंबरठ्यावर

Mahrshtra MLC Election News : राज्यातील विधानपरिषदेच्या 17 जागेसाठी निवडणूक होत आहे. गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणातून कोण-कोण माघार घेणार याची उत्सुकता लागली होती.
Uddhav thackeray, Harshvardhan Sapkal, sharad pawar
Uddhav thackeray, Harshvardhan Sapkal, sharad pawar Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील विधानपरिषदेच्या 17 जागेसाठी निवडणूक होत आहे. गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणातून कोण-कोण माघार घेणार याची उत्सुकता लागली होती. विधानपरिषदेच्या निवडणूक रिंगणातून १७ पैकी दहा ठिकाणी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात नसल्याने मतदानाआधीच महायुतीचे पाच जण बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामध्ये महायुतीमधील पक्षनिहाय पहिले तर भाजपचा एक, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे दोन तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोघे जण बिनविरोध विजयी झाले.

विधान परिषदेच्या या दहा मतदारसंघांतील प्रमुख उमेदवारांच्या माघारीनंतर गेमच पालटला असून यापैकी पाच ठिकाणी महायुतीने गुलाल उधळला आहे. तर दुसरीकडे नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती-संभाजीनगर-जालना, भंडारा-गोंदिया या विधानपरिषदेच्या मतदारसंघातून महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार नसल्याने महायुतीसाठी ही निवडणूक एकतर्फी झाली आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे निवडणूक रिंगणातून कोण माघार घेणार याची उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच महाविकास आघाडीच्या या उमेदवारांच्या माघारींमुळे सहा मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध झाली आहे.

त्यामध्ये ठाणे, रायगड-रत्नागिरी-सिंधूदुर्ग, यवतमाळ, वर्धा, पुणे या मतदारसंघाचा समावेश आहे. या पाच मतदारसंघासोबतच नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती-संभाजीनगर-जालना, भंडारा-गोंदिया या विधानपरिषदेच्या मतदारसंघातून महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार नाही. मात्र याठिकाणी अपक्ष उमेदवार रिंगणात असल्याने येत्या काळात लढत होणार आहे.

Uddhav thackeray, Harshvardhan Sapkal, sharad pawar
MLC Election: विधानपरिषदेच्या 17 जागांवर महायुती विरुद्ध महाविकास आघाडीत 'टस्सल': कोण, कुठे उमेदवार? वाचा एका क्लिकवर

आघाडीच्या जागावाटपात नाशिकचा मतदारसंघ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या (Shivsena) वाट्याला आला होता. याठिकाणी माजी आमदार अनिल कदम यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एबी फॉर्म देखील दिला होता. मात्र, त्यांनी त्याठिकाणी उमेदवारी अर्ज वेळेत भरला नाही. त्यामुळे याठिकाणी महायुतीसाठी संपूर्ण मैदान मोकळे दिसत आहे. याठिकाणी आघाडीला अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देऊन आखाडयात उतरविण्याची नामुष्की ओढावली आहे. त्यामुळे महायुतीसाठी ही लढत एकतर्फी ठरणार आहे.

Uddhav thackeray, Harshvardhan Sapkal, sharad pawar
Parbhani Hingoli MLC election : परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीत बंडखोरांची 'एन्ट्री'! महायुती अन् मविआचे गणित बिघडणार; निवडणुकीत कोणाला बसणार फटका?

सोलापूर विधानपरिषदेच्या रिंगणातून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज छाननीत बाद ठरवण्यात आला फत्तेपूरकर यांच्या अर्जावर सूचक असलेले पंढरपूरचे नगरसेवक नागेश भोसले यांनी, 'ती सही आपली नसून बनावट आहे,' असे स्वयंघोषणापत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले. यामुळे आवश्यक सूचकांची संख्या कमी झाल्याने हा अर्ज रद्द करण्यात आला. त्यामुळे महाविकास आघाडीकडून डमी म्हणून अर्ज भरलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांना आता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून मैदानात उतरवण्यात आले आहे. त्यामुळे महायुतीचे संख्याबळ अधिक असलेल्या या मतदारसंघात महाविकास आघाडीचे आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे याठिकाणी महायुती विजयाच्या उंबरठ्यावर आहे.

Uddhav thackeray, Harshvardhan Sapkal, sharad pawar
MLC election : ऐनवेळी उमेदवाराची माघार,125 मते फोडली! धाराशिव-बीड-लातूरमध्ये पुन्हा 'घोडेबाजार' की मोठा उलटफेर? काँग्रेसमुळे सस्पेन्स वाढला?

अहिल्यानगर मतदारसंघात महाविकास आघाडीला अधिकृत उमेदवार मिळाला नाही. याठिकाणी अपक्ष उमेदवाराला महाविकास आघाडीने अपक्ष करण ससाणे या काँग्रेस बंडखोर उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. मात्र, त्यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे याठिकाणी महायुतीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात असणार आहेत.

Uddhav thackeray, Harshvardhan Sapkal, sharad pawar
MLC election : भाजप आमदारकीचे तिकीट काँग्रेसमधून आलेल्या दोन नेत्यांपैकी कोणाला देणार? विधानपरिषदेच्या धाराशिव-बीड-लातूर 'स्थानिक' मतदारसंघात ट्विस्ट

याठिकाणी आघाडीच्या उमेदवारानी घेतली माघार :

भंडारा-गोंदिया - दिलीप बनसोड (काँग्रेस) माघार.

औरंगाबाद जालना - देवयानी कृष्णा पाटील डोणगावकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) माघार.

सोलापूर - आदित्य फत्तेपूरकर (काँग्रेस) अर्ज बाद.

अहिल्यानगर - करण ससाणे (काँग्रेस बंडखोर) माघार

नाशिक - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अनिल कदम यांना उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र त्यांनी अर्जच दाखल केला नाही.

Uddhav thackeray, Harshvardhan Sapkal, sharad pawar
Vidhan parishad Election : विधानपरिषद निवडणुकीतून 'मविआ'च्या तिघांची माघार; मतदानापूर्वीच महायुतीचा 'या' जागांवर गुलाल कन्फर्म

या 12 मतदारसंघात होणार लढत :

राज्यातील नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर-जालना, परभणी-हिंगोली, नांदेड, धाराशिव-बीड-लातूर, सोलापूर, अहिल्यानगर, सातारा-सांगली, नागपूर, अमरावती, गोंदिया-भांडारा या विधानपरिषदेच्या मतदारसंघात निवडणूक होणार आहे.

Uddhav thackeray, Harshvardhan Sapkal, sharad pawar
Yavatmal-Washim MLC election: काँग्रेसने निवडणुकीपूर्वीच शस्त्र टाकली; उमेदवारीसाठीच्या ‘रसद’मुळे विधानपरिषदेच्या मैदानात बॅकफूटवर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com