Maharashtra Drought; Shivsena UBT Uddhav Thackeray AI
कोकण

Maharashtra Drought : 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, पण कोकणावर अन्याय? ठाकरेंच्या शिलेदाराने फडणवीसांना सुनावले

Shivsena UBT MLA Bhaskar Jadhav Targets Fadnavis Government Over Drought Decision : पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून अखेर राज्य सरकारने 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे.

Aslam Shanedivan

Ratnagiri News : यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून शेककऱ्यांचा खरीप हंगाम देखील वाया गेला आहे. तर पाणी नसल्याने पीकं करपून गेली असून जनावराच्या चाऱ्याचा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. यावरून विरोधकांसह शेतकऱ्यांनी महायुतीवर नाराजी व्यक्त करत आंदोलने केल्यानंतर अखेर राज्य सरकारने 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे.

यात कोकणातील तीन जिल्ह्यातील तालुक्यांचा समावेश आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते तथा आमदार भास्कर जाधव यांनी रोष व्यक्त केला आहे. त्यांनी, सध्याची स्थिती पाहता सरकारने राज्यच दुष्काळ ग्रस्त म्हणून घोषित करायला हवे होते. पण तसे झाले नाही. तर कोकणावर देखील सरकारने अन्याय केल्याचा आरोप केला आहे.

कमी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेल्या राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने शनिवारी (ता. 25 सप्टेंबर 2026 रोजी) याबाबत शासन निर्णय जारी केला. ज्यात अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आदी जिल्ह्यांतील तालुक्यांचा समावेश आहे.

या शासन निर्णयानुसार या तालुक्यांमध्ये दुष्काळ निवारणासाठी विविध उपाययोजना आणि सवलती लागू केल्याचे सांगण्यात आले आहे. जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन आणि शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्यात येणार आहे. तसेच कृषी पंपांच्या वीजबिलातही सवलत देण्यात आली आहे.

दरम्यान या निर्णयानंतर आता विरोधकांकडून सरकारवर टीका होताना दिसत असून संपूर्ण राज्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली जात आहे. अशाच मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे. त्यांनी यावेळी महायुती सरकार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जोरदार निशाना साधला आहे. राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरसकट संपूर्ण राज्यच दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करायला पाहिजे होतं. परंतु त्यांनी फक्त 265 तालुकेच म्हणजे ठराविकच तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले. तर पुन्हा एकदा कोकणावर अन्याय केला.

ते असे करणार याची कल्पना होतीच. यावर्षी कोकणामध्ये खूप पाऊस कमी पडलेला आहे. कोकणातील शेतकरी अडचणीत आहे. भात, नाचणीचे पीक पूर्णपणे अडचणीत आले असून नदीचे पाणी शेताला देऊन देखील शेतात पडलेल्या भेगांमुळे ते थांबत नाही, अशी स्थिती आहे. तरीदेखील राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोकण आणि आमचे तालुके हे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले नाही, असा आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे.

तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा कोकणाकडे बघण्याचा दृष्टिकोन मुळातच नकारात्म असून त्याचे उत्तम उदाहरण हे त्यांचा जुना निर्णय आहे. त्यांनी 2014 ते 2019 दरम्यान शेतकऱ्यांकरता मदत जाहीर केली होती. पण ही मदत शेतकऱ्यांच्या पदरामध्ये पडता पडता नाकी आले होते. अनेक कागदपत्रांची पूर्तता त्या ठिकाणी करता करता शेतकऱ्यांना प्रचंड त्रास झाला होता.

पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. त्यावेळी कुठल्याही प्रकारची अट नव्हती किंवा शेतकऱ्यांची तक्रार नव्हती. परंतु फडणवीस यांनी घोषित केलेली कर्जमाफीची पुर्तता करण्याकरता 72 प्रकारची कागदपत्रे द्यावी लागली. यामुळे आताही ते हे घोषणा करतील पण शेतकऱ्यांच्या पदरामध्ये नेमकं काय पडेल याबाबत मनामध्ये शंका असल्याचे भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT