Maharashtra Drought News : दुष्काळ घोषित न झालेले 93 तालुके कोणते? वाचा जिल्हानिहाय संपूर्ण यादी

Maharashtra Drought : महाराष्ट्रातील 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये ट्रिगर-1च्या निकषांनुसार दुष्काळ जाहीर झाला आहे. मात्र, 93 तालुके दुष्काळी यादीबाहेर असून त्यांना सवलतींचा लाभ मिळणार नाही.
Maharashtra Drought 2026 | 265 Talukas | 93 Excluded
Maharashtra Drought 2026 | 265 Talukas | 93 ExcludedSarkarnama
Published on: 
Updated on: 

मुंबई :

महाराष्ट्रातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. शासनाने ‘ट्रिगर-१’च्या निकषांनुसार दुष्काळ जाहीर करत संबंधित तालुक्यांमध्ये विविध सवलती आणि उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, राज्यातील उर्वरित ९३ तालुके दुष्काळी यादीत समाविष्ट करण्यात आलेले नाहीत.

या ९३ तालुक्यांची जिल्हानिहाय यादी पुढीलप्रमाणे :

मुंबई उपनगर

अंधेरी, बोरीवली, कुर्ला

ठाणे

ठाणे, कल्याण, मुरबाड, भिवंडी, शहापूर, उल्हासनगर, अंबरनाथ

पालघर

पालघर, वसई, डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड

रायगड

पेण, अलिबाग, मुरुड, पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, माणगाव, तळा, रोहा, सुधागड, महाड, पोलादपूर, म्हसळा

रत्नागिरी

लांजा, चिपळूण, गुहागर, दापोली, मंडणगड, खेड

नाशिक

नाशिक, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, चांदवड, निफाड

पुणे

हवेली, जुन्नर, आंबेगाव, मावळ, मुळशी

सातारा

जावळी, कोरेगाव, वाई, पाटण, कराड

सांगली

तासगाव, वाळवा, शिराळा, खानापूर, पलूस, कडेगाव

कोल्हापूर

करवीर, शाहूवाडी, कागल, हातकणंगले, शिरोळ, गडहिंग्लज

नांदेड

मुदखेड, मुखेड

वर्धा

कारंजा

भंडारा

तुमसर, मोहाडी, साकोली, लाखनी

गोंदिया

गोंदिया, गोरेगाव, अर्जुनी मोरगाव, आमगाव, सालेकसा, सडक अर्जुनी, देवरी

चंद्रपूर

बल्लारपूर, ब्रह्मपुरी, जिवती

गडचिरोली

धानोरा, मुलचेरा, देसाईगंज (वडसा), आरमोरी, कुरखेडा, कोरची, अहेरी, भामरागड, सिरोंचा

Maharashtra Drought 2026 | 265 Talukas | 93 Excluded
Maharashtra Drought: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना DBT द्वारे थेट खात्यात पैसे पाठवणार; सरकारची आणखी एक मोठी घोषणा

९३ तालुके दुष्काळाच्या यादीबाहेर

सरकारने २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असला, तरी उर्वरित ९३ तालुके या निर्णयातून वगळले गेले आहेत. त्यामुळे या तालुक्यांतील पिकांची स्थिती, पर्जन्यमान आणि दुष्काळाच्या निकषांबाबतही चर्चा सुरू झाली आहे.

विशेषतः सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, पुणे जिल्ह्यातील मुळशी-मावळ-जुन्नर, नाशिकमधील दिंडोरी-त्र्यंबकेश्वर, तसेच कोकण आणि विदर्भातील अनेक तालुके या यादीत आहेत.

दुष्काळ जाहीर झालेल्या २६५ तालुक्यांना शासनाच्या निर्णयानुसार विविध सवलती आणि मदत उपाययोजनांचा लाभ मिळणार आहे. मात्र, उर्वरित ९३ तालुक्यांतील परिस्थितीबाबत स्थानिक पातळीवर पुढे काय निर्णय घेतला जातो, याकडेही लक्ष लागले आहे.

Maharashtra Drought 2026 | 265 Talukas | 93 Excluded
Maharashtra Drought : सध्याचा प्राथमिक निर्णय; दुष्काळग्रस्त यादीत आणखी तालुक्यांचा होणार समावेश; महसूल मंत्र्यांनी मांडली सविस्तर भूमिका

सध्याचा प्राथमिक निर्णय; दुष्काळग्रस्त यादीत आणखी तालुक्यांचा होणार समावेश

दरम्यान, सध्याचा जीआर हा प्राथमिक असून पुढील टप्प्यात आणखी काही तालुक्यांचा समावेश होऊ शकतो अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. "हा प्राथमिक शासन निर्णय आहे. मुख्यमंत्र्यांनी मला राज्याच्या कॅबिनेट सबकमिटीचा चेअरमन केलं आहे. मी सुद्धा आता जिल्ह्यांमध्ये प्रवास करुन शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत ते समजून घेणार आहे. त्यानुसार, अजूनही काही तालुक्यांसाठी भौगोलिक परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागणार आहेत. तसंच काही तालुके हे जर काही ट्रिगरमुळं कमी जास्त झाले असतील, पण पुढच्या काळात हे तालुके कमी-जास्त होतीलही", असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com