Uddhav Thackeray, Kirit Somaiyya Sarkarnama
कोकण

Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरेंना धक्का; कोर्लईतील कथित १९ बंगल्याप्रकरणी पहिली अटक

Korlai 19 Banglow : सात जणांवर कागदपत्रांत हेराफेरी केल्याचा आरोप

सरकारनामा ब्युरो

Konkan News : रायगड जिल्ह्यातील कार्लईतील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कथित १९ बंगल्याप्रकरणी सोमवारी (ता. १०) रात्री एकाला अटक करण्यात आली आहे. कोर्लईचे माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना या प्रकरणी पहिली अटक झाली आहे. या अटकेमुळे उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्यात शक्यता आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiyya) यांनी रायगडमधील कोर्लई गावात उद्धव ठाकरे यांची संपत्ती असल्याचा दावा केला होता. या वर्षाच्या सुरुवातीला कोर्लईतील १९ बंगल्यांप्रकरणी सोमय्या यांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यावर आरोप केले होते. त्यानुसार या कथित बंगल्यांच्या घोटाळाप्रकरणी कोर्लईतील यातकोर्लई गावाचे आजी-माजी तीन ग्रामसेवक आणि चार सरपंच अशा सात जणांचा समावेश होता. गटविकास अधिकाऱ्यांवर गटविकास अधिकाऱ्याने ४२० अंतर्गत हा गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा फेब्रुवारीमध्ये रेवदंडा पोलीस ठाण्यात दाखल केला होता.

गावातील असलेले १९ बंगल्यांचे कनेक्शन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यांशी असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. दरम्यान दाखल केलेल्या तक्रारीत ठाकरे कुटुंबीयांपैकी कुणाचेही नाव नाही. या प्रकरणी तपास यंत्रणांनी प्रशांत मिसाळ यांच्यासह इतरांच्या कागदपत्रांची तपासणी केली. त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच इतर लोकांची चौकशी सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी संबंधितांनी खोटे कागदपत्र सादरे केले आहेत. कर कमी दाखविण्यासाठी काही कागदपत्रांची फेरफार केली होती. दरम्यान अन्वय नाईकांकडून घेतलेली जागा कुणाच्या नावावर केली, याचा तपास करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर मिसाळांना झालेली अटक उद्धव ठाकरे यांच्यासाठी अडचणीची ठरणार असल्याचे मानले जात आहे. (Political Breaking News)

किरीट सोमय्या यांनी या बंगल्याशी उद्धव ठाकरेंशी संबंध असल्याचा आरोप केला होता. या त्यानंतर फेब्रुवारीमध्ये या प्रकरणी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये सरकारी रेकॉर्डमध्ये खाडोखोड करुन फसवणूक केल्याचा आरोप ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांवर केला आहे. तपासानंतर आज मिसाळ यांना अटक करण्यात आली आहे. या अटकेमुळे माजी मुख्यमंत्री ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Latest Maharashtra News)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT