NCP Lose Status of National Party : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 'या' राज्यांनी दिला दणका

National Political Party : २०१० मध्ये मिळालेला राष्ट्रीय दर्जा २०१४ पर्यंत होता कायम
NCP Flag
NCP FlagSarkarnama

Sharad Pawar News : काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर खासदार शरद पवार यांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यानंतरी त्यांनी महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यातही निवडणुका लढविल्या. त्यात पक्षाला चांगले यश मिळाले होते. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाला १० जानेवारी २०१० रोजी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला. हा दर्जा २०१४ पर्यंत कायम होता.

त्यानंतर मात्र इतर राज्यातील राष्ट्रवादी पक्षाची कामगिरीवर परिणाम झाला. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून पक्षाला वारंवार नोटीस देण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर आता निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे. हा निर्णय राष्ट्रवादीला काँग्रेसला मोठा दणका मानला जात आहे.

NCP Flag
Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का; राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द

स्थापनेनंतर राष्ट्रवादी पक्षाने महाराष्ट्रासह अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणीपूर, मेघालय, गोवा या राज्यात चांगली कामगिरी केली होती. त्या राज्यात राष्ट्रवादीला काँग्रेसला राज्य पक्षाचा दर्जा दिलेला होता. दरम्यान २०१४ नंतर याच राज्यातील राष्ट्रवादीच्या जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रीय पक्षाचे निकषातून राष्ट्रवादी पक्ष बाद झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. आजच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे संबंधित राज्यातील राष्ट्रवादी पक्षाचा राज्य पक्ष म्हणून दर्जाही गेलेला आहे.

NCP Flag
K Chandrashekar Rao : चंद्रशेखर राव काँग्रेसला देणार मोठा धक्का; दोन आमदार 'बीआरएस'मध्ये करणार प्रवेश?

राष्ट्रवादी पक्षाच्या (NCP) राष्ट्रीय दर्जा कमी करण्याबाबत निवडणूक आयोगाने १८ पानांची ऑर्डर काढली आहे. त्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणत्या राज्यात किती टक्के प्रभाव आहे, याचे निरीक्षण नोंदविले आहे. राष्ट्रवादीने महाराष्ट्रात २०१९ मध्ये २८८ पैकी ५४ जागा जिंकल्या आहेत. इतर ठिकाणी मात्र राष्ट्रवादी पक्षाचे अस्तित्व कमी झालेले दिसून येत आहे. सध्या गोव्यात २ टक्के, मणिपूरमध्ये ०.९५ टक्के, मेघालय मध्ये १.६१ टक्के, नागालँडमध्ये एक टक्के मते राष्ट्रावदी काँग्रेला मिळालेली आहेत.

NCP Flag
Konkan News : पोलिसांनी चार दिवस मुक्काम ठोकला; पण राष्ट्रवादीच्या नगरसेवकपुत्राला अटकच केली

दरम्यान, लोकसभेत राष्ट्रवादी पक्षाचे पाच खासदार आहे. त्यात महाराष्ट्रातील चार तर लक्षद्विपमधील एका खासदाराचा समावेश आहे. तत्पूर्वी २०१४ मध्ये पक्षाचे चारच खासदार होते. राष्ट्रवादी पक्षाची २०१४ मध्ये कामगिरी खालावली गेली. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून पक्षाला वारंवार नोटीस दिल्या जात होत्या. त्यानतंर आज राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राष्ट्रीय पक्षाचा दर्जासाठीची पात्रता

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ६ टक्के मते चार किंवा अधिक राज्यांमध्ये मिळवली पाहिजेत. लोकसभा निवडणुकीत चार जागांवर त्या पक्षाला कोणत्याही राज्यात विजय मिळवता आला पाहिजे. लोकसभा निवडणुकीत २ टक्के जागांवर विजय मिळवता आला पाहिजे आणि ते विजयी उमेदवार तीन वेगवेगळ्या राज्यातून विजयी झालेले असणे आवश्यक आहे. चार राज्यांमध्ये संबंधित पक्षाला प्रादेशिक पक्षाचा दर्जा असणे आवश्यक आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com