Nitesh Rane, Narayan Rane Sarkarnama
कोकण

Narayan Rane : 'मशिदीत घुसून मारू…'; नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर नारायण राणेंच स्पष्टीकरण म्हणाले, "मशिद हा शब्द…"

Narayan Rane on Nitesh Rane : "पण भारतात राहून देशविरोधी कृत्य करणाऱ्या लोकांच्या विरुद्ध देशातील किती मुस्लिमांनी आवाज उठवला? त्यांनी काहीही बोललं तरी चालतं महिलांवर अत्याचार केलं तरी चालतं. त्यावेळी आमच्या भावना का तीव्र होत नाहीत?"

Jagdish Patil

Sindhudurg News, 16 Sep : "रामगिरी महाराजांच्या विरोधात बोलाल तर मशिदीत शिरून चून चून के मारेंगे",असं वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मागील काही दिवसांमध्ये केलं होतं.

आता नितेश यांच्या याच वक्तव्यावर त्यांचे वडील आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी स्पष्टीकरण देताना, नितेश राणेंनी वापरलेला शब्द चुकीचा होता असं म्हटलं आहे. सिंधुदुर्ग येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या प्रकरणावर भाष्य केलं.

राणे (Narayan Rane) म्हणाले, "नितेश राणेंनी जे काही व्यक्तव्य केलं. त्याला तसं म्हणायचं नव्हतं. आमच्या देशात येऊन तुम्ही अतिरेकी कारवाया करणार असाल तर आम्ही आक्रमक होऊ, असं त्याला म्हणायचं होतं. मात्र, मशिद हा शब्द त्याने वापरायला नको होता. त्यानंतर त्याने खुलासा केला, की माझी चूक झाली."

तसंच, मशिदीत घुसून मारू हा त्याचा शब्द चुकीचाच होता, पण भारतात राहून देशविरोधी कृत्य करणाऱ्या लोकांच्या विरुद्ध देशातील किती मुस्लिमांनी आवाज उठवला? त्यांनी काहीही बोललं तरी चालतं महिलांवर अत्याचार केलं तरी चालतं. त्यावेळी आमच्या भावना का तीव्र होत नाहीत. नितेश बोलला की आपले लोक प्रश्नांचा भडिमार करतात.

सगळेच मुस्लिम वाईट नाहीत, आमचे भारतीय नागरिक किंवा देशाबद्दल प्रेम असणारे मुसलमान आहेत, त्यांना बोलायचं नाही पण हिंदू धर्माच्या महिलांवर अत्याचार होतो तेंव्हा ते राष्ट्रप्रेमी मुस्लिम (Muslim) का बाजू घेत नाहीत. पण आज नितेश तोंड बंद करेल पण अनेक नितेश राणे, नारायण राणे तयार होतील, असं नारायण राणे यावेळी म्हणाले.

नितेश राणे नेमकं काय म्हणाले होते?

रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ बोलताना नितेश राणे म्हणाले, "रामगिरी महाराजांनी सिन्नरमधील प्रवचनात जो मुद्दा मांडला तो सतत मांडत रहावा, संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी आहे. जर रामगिरी महाराजांच्या विरोधात कोणी बोललं, कोणी मस्ती केली तर मशिदीत घुसून चून-चून के मारेंगे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT