Uddhav Thackeray News: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गणेश दर्शनासाठी सरन्यायाधीस डी. वाय. चंद्रचूड यांच्या घरी गेले होते. पंतप्रधानांच्या हस्ते गणेश आरती देखील करण्यात आली. पंतप्रधान मोदींनी डोक्यावर घातलेली गांधी टोपी सगळ्याचे लक्ष वेधून घेत होती. उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देत गणेश आरती केली.
उद्धव ठाकरे यांनी देखील गणेश आरती करताना गांधी टोपी घातली होती. त्यांचा तो फोटो ठाकरे गटाच्या सोशल मिडिया राज्य समन्वयक आणि फायरब्रँड नेत्या अयोध्या पौळ यांनी शेअर केला आहे.
अयोध्या पौळ यांनी उद्धव ठाकरेंचा फोटो शेअर करताना हॅशटॅग वापरत 'बाप' येवढा एकच शब्द वापरला आहे. अयोध्या पौळ या आपल्या भाषणात देखील उद्धव ठाकरे हे आपले पालक असल्याचा उल्लेख करत असतात.
पौळ या मुख्यमंत्र्यांच्या निवास्थान 'वर्षा'वर जाऊन गणेश आरती केल्यानंतर त्या शिंदे गटात जाणार म्हणून चर्चा सुरू होती. मात्र, पौळ यांनी त्या उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असून ते शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी वर्षावर गेल्याची माहिती दिली होती.
शिर्डीमध्ये पेन्शन धारकांचे महाअधिवेशन सुरू होते. उद्धव ठाकरे या महाअधिवेशनाला संबोधित करत असताना नाना पटोले यांचे आगमन झाले. नाना पटोलेंनी 'एकच मिशन, जुनी पेन्शन' लिहिलेली गांधी टोपी डोक्यावर चढवली. यावर ठाकरेंनी, 'बघा आम्ही आमच्या टोप्या घालून घेतो. पण लोकांना टोप्या घालत नाही. ते काम मिंधे सरकार करतं', अशी टिप्पणी केली. उद्धव ठाकरेंच्या या टिप्पणीवर सभागृहात जोरदार हशा झाला.
छत्रपती संभाजीनगर दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या भेटीवर चांगलीच कोपरखळी लगावली. ठाकरे म्हटले मी या भेटीची निंदा करणार नाही. मात्र, उलट मी सरन्यायाधीशांचे आभार मानतो. कारण, त्यांनी त्यांच्या घरी मोदी येणार आहेत, म्हणून गणपती बाप्पाला पुढची तारीख दिली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.